2025 मध्येही कोसळू शकतो शेअर बाजार; गुंतवणुकीपुर्वी 'या' गोष्टींची काळजी घ्याच..!
चालू आठवड्याप्रमाणे आज दिवसभरात देखील शेअर बाजारात बरेच चढ-उतार दिसून आले आहे. बुधवारच्या (ता.२३) ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात तीव्र चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही थोड्या घसरणीसह बंद झाले आहेत. याशिवाय मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये देखील जोरदार खरेदी परतली आहे. ज्यात गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये मोठी घसरण झाली होती. आज (ता.२३) शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 138 अंकांच्या घसरणीनंतर, 80081अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 37 अंकांनी घसरून 24,435 अंकांवर बंद झाला आहे.
1742 शेअर घसरणीसह बंद
आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात (बीएसई) एकूण 4031 शेअर्सचे व्यवहार झाले आहेत. ज्यात 2189 समभाग वाढीसह बंद झाले आहे तर 1742 शेअर तोट्यासह बंद झाले आहेत. उर्वरित 100 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स हे वाढीसह आणि 22 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत.
कोणते शेअर्स तेजीत, कोणते घसरले
राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स हे वाढीसह आणि 32 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत. वाढत्या समभागांमध्ये बजाज फायनान्स 4.90 टक्के, टेक महिंद्रा 2.14 टक्के, टाटा कंझ्युमर 1.78 टक्के, बजाज ऑटो 1.75 टक्के, एचडीएफसी बँक 1.26 टक्के, टीसीएस 1.24 टक्के यांचा समावेश आहे. तर घसरलेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 3.22 टक्क्यांनी, सन फार्मा 2.69 टक्क्यांनी, आयशर मोटर्स 2.07 टक्क्यांनी, श्रीराम फायनान्स 1.86 टक्क्यांनी, तर पॉवर ग्रिडचा शेअर 1.84 टक्क्यांनी घसरला आहे.
मार्केट कॅपमध्ये वाढ
आजच्या सत्रात आयटी शेअर्स आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे बाजार भांडवलात उसळी आली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 445.39 लाख कोटींवर बंद झाले आहे. जे गेल्या सत्रात 444.45 लाख कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 94000 कोटी रुपयांची झेप दिसून आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)