(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिषेक मूळचा भोपाळमधील विदिशा जिल्ह्यातील रामपूर गावचा आहे. १५ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासह भोपाळला स्थायिक झाला. सुरुवातीला त्याने एक इंटरनेट कॅफे चालवला, पण मोबाईल फोन आणि ऑनलाइन सेवांच्या वाढत्या वापरामुळे त्याला तो व्यवसाय बंद करावा लागला.
मग अभिषेकने पुढे काय करावं या विचारात लहानपणीच्या छंदाला व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. त्याला लहानपणापासून स्वयंपाक करायला खूप होती. यूट्यूबवरील विविध पाककृती पाहून तो सँडविच बनवायला शिकला. त्याच्या कुटुंबाला त्याचे सँडविच खूप आवडायचं. त्यानंतर त्यात काही बदल सुचवले आणि त्यानंतर अभिषेकने स्वतःचा स्ट्रीट फूड व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ‘हरी हर सँडविच’ नावाची एक फूड कार्ट सुरू केला.
सुरुवात केली तेव्हा अगदी छोट्या स्वरुपात व्यवसाय होता,. पण अभिषेकने सोशल मीडियाचा वापर सुरू केला. त्याने आपल्या सँडविच गाडीचा एक साधा रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. काही वेळातच तो रील चांगलाच व्हायरल झाला. यानंतर त्याच्या सँडविचला मागणी वाढली. भोपाळच्या विविध भागांतील लोक त्याचे सँडविच खायला येऊ लागले. आज त्याच्या गाडीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. अनेक ग्राहक एका सँडविचसाठी तासभर थांबायला तयार असतात.
माध्यमांच्या वृत्तानुसार, हरि हर सँडविचची लोकप्रियता बरीच वाढली आहे. दररोज ६०० हून अधिक सँडविच विकले जातात. वीकेंडला हा आकडा १००० हून अधिक सँडविचपर्यंत पोहोचतो. या व्यवसायाची मासिक उलाढाल सुमारे २५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. हरि हर सँडविचचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या एकाच प्रकारचे सँडविच इथं मिळतं तरी सुद्धा लोकं त्याच्या या सँडविचचा अस्वाद घ्यायला लांबून लांबून येतात.






