सुधा मुर्तीं 20,000 रुपये देत होत्या, नाकारत पुजारी म्हणाला... ही चुक पुन्हा करु नका!
प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेक वेळा सार्वजनिक व्यासपीठांवरून अशा गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे लोकांना त्यापासून मोठी प्रेरणा मिळते. त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक कथा आहेत. अलीकडेच त्यांनी एका घटनेबद्दल उघडपणे सांगितले आहे. त्या एकदा तामिळनाडू दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. आज आपण त्यांच्या या घटनेबाबत जाणून घेणार आहोत…
तामिळनाडू दौऱ्यातील स्तब्ध करणारा किस्सा
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या परिचयाची गरज नाही. त्या लेखिका आणि राज्यसभा सदस्यही आहेत. अलीकडेच त्या तामिळनाडू दौऱ्यावर असताना प्रवासात त्यांची एका अंध पुजाऱ्यासोबत भेट झाली. त्यांनी त्या पुजाऱ्याला 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे ठरवले. मात्र, त्या पुजाऱ्याने ती रक्कम न घेता सुधा मूर्ती यांना अशी चुक पुन्हा करु नका असा सल्ला दिला. त्यामुळे त्याचे हे उत्तर ऐकून, त्या स्तब्घ झाल्या होत्या.
काय आहे संपुर्ण किस्सा
एकदा सुधा मूर्ती तामिळनाडूत प्रवास करत होत्या. रस्त्यात त्यांची गाडी खराब झाली. ड्रायव्हरने सांगितले की जवळच मंदिर आहे. तिथे थांबूया. अंध पुजारी पत्नीसोबत मंदिरात राहतो. असे चालकाने त्यांना सांगितले. सुरुवातीला सुधा मूर्ती यांना त्या ठिकाणी राहणे योग्य वाटले नाही. मात्र, नंतर त्या मंदिरात काही काळ थांबण्यास तयार झाल्या. सुधा मूर्ती आणि त्यांचा चालक दोघेही मंदिरात पोहोचल्यावर पुजारी आणि त्याच्या पत्नीने त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागताने आणि काळजीने सुधा मूर्ती भारावून गेल्या.
हेही वाचा – 1 लाखाचे झालेत, 76 लाख रुपये; ‘या’ मल्टिबॅगर शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
वृद्धापकाळात आधार म्हणून २० हजारांची आर्थिक मदत
ज्यामुळे त्यांनी आपला झालेला पाहूणचार पाहता त्या गरिब अंध पुजाऱ्याला वृद्धापकाळात आधार म्हणून २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे ठरवले. मात्र, त्यांची ही आर्थिक मदत त्या पुजाऱ्याने नाकारली. पुजारी म्हणाला, ‘तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण मी तुम्हांला सांगू इच्छितो. ही चूक आयुष्यात कधीही करू नका. पुजाऱ्याचे हे ऐकून सुधा मूर्ती आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी त्याला विचारले, तू असे का बोलत आहेस?
देवाने जे दिलंय, ते पुरेसे आहे
यावर पुजारी म्हणाला, ‘हे पैसे तुम्ही मला दिले तर ते माझ्यासाठी ओझे होईल. गावकरी सध्या आमची काळजी घेतात, पण माझ्याकडे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20,000 रुपये आहेत. त्यांना समजले तर ते पैसे मिळावेत. यासाठी माझ्या मृत्यूची इच्छा करू लागतील. आणि आम्हांला मदतही करणार नाही. देवाने आपल्याला सध्या जे दिले आहे, ते पुरेसे आहे. आयुष्यात तुम्हाला मर्यादा पाळायला शिकले पाहिजे. असेही अंध पुजाऱ्याने सुधा मूर्ती यांना सांगितले. त्याचे शब्द ऐकून त्या काही काळ स्तब्ध झाल्याचे त्या सांगतात.