1 लाखाचे झालेत, 76 लाख रुपये; 'या' मल्टिबॅगर शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स, गुंतवणूकदारांंना चांगला परतावा देत असतात. मात्र, त्यासाठी शेअर्सचे अवलोकन करता येणे खुप गरजेचे आहे. गुंतवणूक करण्याआधी संबंधित शेअरची आर्थिक स्थिती काय आहे. संबंधित कंपनी काम करत असलेले क्षेत्र कोणते आहे. या कंपनीकडील कामाचा अभ्यास केल्यास, गुंतवणूक करायची की नाही? हे ठरवता येते. दरम्यान, सध्या मल्टिबॅगर शेअर ठरलेल्या अशाच एका कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे.
शेअरच्या किंमतीत वर्षभरात 503 टक्क्यांनी वाढ
ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीने चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या शेअरची किंमत अवघ्या एका वर्षात तब्बल 503 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे या शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस ही कंपनी वैयक्तिक स्वरुपासाठी तसेच उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देते. चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरच्या मूल्य अवघे 5.4 रुपये होते. आता हाच शेअर शुक्रवारी (ता.२३) मुंबई शेअर बाजारावर तब्बल 411.85 रुपयांवर पोहोचला आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – शेअर बाजारात लवकरच येणार ‘हा’ 2000 कोटींचा आयपीओ; गुंतवणुकीची मोठी संधी!
एक लाखाचे चार वर्षात झालेत 76.30 लाख रुपये
समजा चार वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या कंपनीत 10000 गुंतवले असते. तर आज या पैशांचे मूल्य आज 7.63 लाख रुपये इतके झाले असते. तुम्ही चार वर्षांपूर्वी या कंपनीत 50000 रुपये गुंतवले असते. तर आज तुमच्याकडे या शेअरच्या माध्यमातून 38.15 लाख रुपये झाले असते. तुम्ही चार वर्षांपूर्वी या कंपनीत 1 लाख गुंतवले असते. तर आज तुमच्या एक लाख रुपयांचे तब्बल 76.30 लाख रुपये झाले असते.
पाच दिवसांत शेअरची किंमत 20 टक्क्यांनी वाढली
ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीचे भागभांडवल 167 कोटी रुपये इतके आहे. 2024 या वर्षभरात आतापर्यंत हा शेअर 95 टक्क्यांनी वाढलेला आहे. या कंपनीची जून 2024 पर्यंत 54.18 टक्के मालकी ही प्रमोटर्सकडे होती. पाच दिवसांच्या सत्रात या शेअरचे मूल्य 20 टक्क्यांनी वाढले आहे. ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीचे एप्रिल-जून 2024 या तिमाहीतील उत्पन्न 45.92 लाख रुपये राहिले आहे. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पन्न 17.19 लाख रुपये इतके होते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)