Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्षात टाटा समुह मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत; भरघोस कमाईसाठी पैसे तयार ठेवा!

कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये आयपीओंच्या आकडेवारीने अनेक विक्रम मोडले. आता अनेक कंपन्या 2025 मध्ये आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. टाटा ग्रुप कंपनीचाही त्यात समावेश आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 24, 2024 | 05:43 PM
नववर्षात टाटा समुह मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत; भरघोस कमाईसाठी पैसे तयार ठेवा!

नववर्षात टाटा समुह मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत; भरघोस कमाईसाठी पैसे तयार ठेवा!

Follow Us
Close
Follow Us:

कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये आयपीओंच्या आकडेवारीने अनेक विक्रम मोडले. आता अनेक कंपन्या 2025 मध्ये आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. टाटा ग्रुप कंपनीचाही त्यात समावेश आहे. कारण टाटा कॅपिटलचा आयपीओ पुढील वर्षी लॉन्च होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा टेक्नॉलॉजीजच्या बंपर लिस्टनंतर एक वर्षाहून अधिक काळ टाटा कॅपिटल आता नवीन वर्षात आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यावर काम सुरू करण्यात आले आहे.

आयपीओबाबत तपशील

एका वृत्तसंकेतस्थळाच्या अहवालानुसार, एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखालील वैविध्यपूर्ण समूह टाटा समूहाने वित्त सेवा कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओवर काम सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समूहाचा हा मेगा आयपीओ 15,000 कोटी रुपयांचा असू शकतो. कंपनीने सध्या लॉ फर्म सिरिल अमरचंद मंगलदास आणि गुंतवणूक बँक कोटक महिंद्रा कॅपिटल यांना आयपीओसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय, अहवालात असेही म्हटले आहे की, इतर गुंतवणूक बँकांना सामील करण्यासाठी लवकरच चर्चा केली जाणार आहे.

आता 10 मिनिटांत किराणा घरपोच मिळणार; झेप्टो, ब्लिंकिट, फ्लिपकार्टला टक्कर देणार ‘ही’ कंपनी

कंपनीबाबत थोडक्यात माहिती

टाटा कॅपिटल ही नॉन-बँकिंग वित्तीय सेवा (एनबीएफसी) फर्म आणि टाटा सन्सची उपकंपनी असून, ही व्यवसाय समूहाची प्रमुख गुंतवणूक धारण कंपनी आहे. सध्या या संदर्भात टाटा सन्स, टाटा कॅपिटल, सिरिल अमरचंद मंगलदास आणि कोटक महिंद्रा कॅपिटलकडून कोणतेही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्विसेस जानेवारी 2024 मध्ये टाटा कॅपिटलमध्ये मध्ये विलीन झाली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी आरबीआयने बिगर बँकिंग वित्ती संस्था एनबीएफसीसाठी स्केल आधारित नियमन अंतर्गत वरच्या स्तरातील 16 एनबीएफसीची यादी जाहीर केली आहे. फ्रेमवर्कने एनबीएफसीचे वर्गीकरण बेस लेयर (NBFC-BL), मिडल लेयर (NBFC-ML), अप्पर लेयर (NBFC-UL) आणि टॉप लेयर (NBFC-TL) मध्ये केले गेले आहे. त्यात म्हटले आहे की, वरच्या स्तरामध्ये त्या NBFC चा समावेश असेल ज्यांना विशेषत: मापदंड आणि स्कोअरिंग पद्धतीच्या आधारावर रिझर्व्ह बँकेने रेटिंग दिले आहे

आरबीआयच्या ‘अपर लेयर लिस्ट’ मधील आणखी एक फर्म बजाज हाउसिंग फायनान्सने 16 सप्टेंबर रोजी बाजारात जबरदस्त पदार्पण केले आहे. आणि ट्रेडिंग सत्राच्या शेवटी 135 टक्के प्रीमियमसह वरच्या सर्किटवर पोहोचले होते.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Tata group is preparing to launch a mega ipo tata capital in the new year keep money ready for huge earnings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 05:43 PM

Topics:  

  • IPO
  • Tata Group

संबंधित बातम्या

या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ सुरू होत आहेत, किंमत पट्टा; सबस्क्रिप्शनची तारीख जाणून घ्या
1

या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ सुरू होत आहेत, किंमत पट्टा; सबस्क्रिप्शनची तारीख जाणून घ्या

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा
2

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा

IPO News: अरे वाह! ‘या’ आयपीओचा GMP अजूनही मजबूत, गुंतवणूकदारांनी केली स्पर्धा
3

IPO News: अरे वाह! ‘या’ आयपीओचा GMP अजूनही मजबूत, गुंतवणूकदारांनी केली स्पर्धा

BlueStone Jewellery IPO च्या जीएमपीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नाही, सबस्क्रिप्शन स्टेटस आणि इतर तपशील तपासा
4

BlueStone Jewellery IPO च्या जीएमपीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नाही, सबस्क्रिप्शन स्टेटस आणि इतर तपशील तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.