
Disagreements in ‘Tata Trust’ over Neville Tata’s appointment
TATA Trust Controversy : 150 वर्षाहून चालत आलेल्या TATA समूहात घराणेशाहीचे राजकारण चांगलेच तापले आहे. यापूर्वी विजय सिंग यांच्या र्नियुक्तीवरून वाद झाला होता. आता मात्र, नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा यांच्या टाटा ट्रस्टमधील नियुक्तीवरून मतभेद निर्माण झाले आहे. टाटा समूहातील अंतर्गत वाद वेगळंच वळण घेत आहे. टाटा सन्समध्ये सर्वात जास्त हिस्सा असलेल्या दोन दिग्गज ट्रस्टपैकी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा आणि टायटन कंपनीचे माजी प्रमुख भास्कर भट्ट यांच्यामध्ये सर रतन टाटा ट्रस्ट अर्थात SRTT च्या नियुक्तीवरून वाद सुरू आहे. यामध्ये नेव्हिल टाटा यांच्या नियुक्तीवरून विश्वस्तांमध्ये मतभेद आहेत. विश्वस्त वेणू श्रीनिवासन यांनी नेव्हिल आणि भट्ट यांच्या SRTT च्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला असल्याने नियुक्ती रोखली गेली.
हेही वाचा : October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल
नेव्हिल आणि भट्ट या दोघांच्या ही बैठकीत श्रीनिवासन टाटा नव्हते. टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्तांची नियुक्ती करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी एकमताने संमती महत्वाची असते. त्यामुळेच एसडीटीटी बोर्डावर नेव्हिल आणि भट यांची नियुक्ती झाली. परंतु एसआरटीटीची नाही झाली.
श्रीनिवासन यांची गेल्या महिन्यात कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून दोन्ही ट्रस्टसाठी नियुक्ती केली गेली. परंतु, महाराष्ट्र सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार एक चतुर्थांश इतकी कायमस्वरूपी विश्वस्तांची संख्या मर्यादित केली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने नेव्हिल यांचे नाव खंबाटा यांनी सुचवले होते. तर, सिंग यांनी भट्ट यांचे नाव पुढे केले. टाटा ट्रस्टच्या बैठकीत सर्व सदस्यांनी श्रीनिवासन यांच्या अनुपस्थितीत मंजूर केले. नेव्हिल यांच्या नावावर नोएल यांनी मतदान केले नाही तर खंबाटा यांनी टाटांचा वारसा पुढे नेण्यासाठी नेव्हिलची नियुक्ती महत्वाची आहे, यावर भर दिला. रतन टाटा त्यांच्या हयातीत विशेषतः नेव्हिल यांची नियुक्ती पाहण्यासाठी इच्छित होते असेही एका अधिकाऱ्याने म्हंटले आहे. आता ‘टाटा ट्रस्ट’साठी घराणेशाही की विश्वस्त यामध्ये कोण सरस ठरेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.