Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यवसाय करावा तर असा… लेकीचा वाढदिवसामुळे सुरु झाले लाखोंचे उत्पन्न!

केक बनवण्याचा छंद होता आणि लेकीच्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने केक तयार करण्याची इच्छा होती. याने उभा केला मोठा व्यवसाय. आता महिन्याला ६० ते ७० हजार रुपयांची कमाई होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2025 | 03:25 PM
व्यवसाय करावा तर असा… लेकीचा वाढदिवसामुळे सुरु झाले लाखोंचे उत्पन्न!
Follow Us
Close
Follow Us:

नाशिकमधील तेजस्विनी खैरनार यांना आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी घरच्या घरी केक बनवायचा होता. हे फक्त एक साधं स्वप्न वाटलं होतं, पण त्यातूनच त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. त्या दिवशी बनवलेला केक इतका गोड अनुभव देऊन गेला की त्यांनी तो आपला व्यवसाय बनवला आणि आज त्या स्वतःचा “Tejaswini Cakes” हा ब्रँड उभा करून महिन्याला ६० ते ७० हजार रुपये कमवत आहेत.

शेअर बाजाराने घेतला यू टर्न, सेन्सेक्स निफ्टी लाल रंगात; गुंतवणूकदार चिंतेत

तेजस्विनी यांनी बी.कॉम आणि डी.एड. केलं असून पूर्वी त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. नोकरी चांगली होती, पण काही कौटुंबिक कारणांमुळे ती सोडावी लागली. घरात बसणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या केक बनवण्याच्या आवडीतून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

केक डिझायनिंग, फ्लेवर्स आणि सादरीकरण या सगळ्या गोष्टी त्यांनी सोशल मीडियावरून आणि थोडेसे क्लासेस लावून शिकून घेतल्या. एकदा केक बनवून फोटो टाकला आणि पाहता पाहता त्यांच्या मैत्रीणी, नातेवाईक, ओळखीचे लोक ऑर्डर देऊ लागले. ग्राहकांची पसंती मिळू लागल्यावर त्यांनी हे अधिक गंभीरपणे सुरू केलं.

प्रत्येक ऑर्डर त्या अत्यंत प्रेमाने बनवतात, बर्थडे, अ‍ॅनिव्हर्सरी, स्पेशल थीम्स, कस्टम डिझाईन असे अनेक प्रकार त्यांनी आत्मसात केले आहेत. त्यांच्या घरातूनच हा सगळा व्यवसाय चालतो आणि तरीही त्यांनी क्वालिटीमध्ये कधीही तडजोड केली नाही. आज तेजस्विनी ना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर एक प्रेरणादायी उद्योजिका म्हणूनही त्यांचं नाव नाशिकमध्ये ओळखलं जातं. त्यांचं म्हणणं आहे, “स्वप्न मोठं असावं लागत नाही, त्यातला आत्मविश्वास आणि सातत्य मोठं असायला हवं.”

डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीमधील बदलामुळे बीएसईला धक्का, शेअर्समध्ये मोठी घसरण

तेजस्विनी यापुढे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार कशाप्रकारे करत आहेत? याकडे साऱ्यांचा लक्ष लागून आहे, तसेच त्यांच्या परिचयांना अशी अशा आहे की त्यांनी त्यांचा व्यवसाय आणखीन मोठ्या टप्प्यावर न्ह्यावा आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Web Title: The story of tejaswini khairnar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Business Idea

संबंधित बातम्या

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा
1

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा

कालपर्यंत थेल्यावर विकत होता चाट! आज त्याची प्रगती बघून तुम्ही पडाल चाट
2

कालपर्यंत थेल्यावर विकत होता चाट! आज त्याची प्रगती बघून तुम्ही पडाल चाट

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड
3

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड

वडिलांकडून घेतली प्रेरणा! पट्ठ्या खेळतोय कोटींच्या रकमेत… ‘प्लास्टिकचा योग्य वापर’
4

वडिलांकडून घेतली प्रेरणा! पट्ठ्या खेळतोय कोटींच्या रकमेत… ‘प्लास्टिकचा योग्य वापर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.