'या' कारणांनी शेअर बाजारात झाली अचानक वाढ, सेन्सेक्स ११०० अंकांनी वधारला, जाणून घ्या (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Share Market Marathi News: सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स १०८९ अंकांनी वाढून ७४२२७ वर बंद झाला, तर निफ्टी ३७४ अंकांनी वाढून २२५३५ वर बंद झाला. दुपारी १:३० वाजेपर्यंत, सेन्सेक्स १७०० अंकांनी वाढून ७४,८०० वर पोहोचला होता आणि निफ्टी ५०० अंकांनी वाढून २२,६५० वर पोहोचला होता. आरबीआयच्या एमपीसी बैठकीच्या निर्णयाच्या एक दिवस आधी बाजारात ही वाढ झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रेपो दरात २५ बेसिस पॉइंटने कपात करू शकते अशी अपेक्षा आहे. बाजारातील वाढीसोबतच, बीएसई बाजार भांडवलातही वाढ झाली आहे आणि ते ४.६१ लाख कोटी रुपयांनी वाढून ३९३.८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्समध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर धातू, रिअल्टी आणि वित्तीय क्षेत्रांमध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. इंडिया फियर गेज (इंडिया VIX) १०.२% ने घसरून २०.४७ वर पोहोचला आहे.
अमेरिकन आणि आशियाई बाजारपेठेत झालेल्या प्रचंड तेजीमुळे, आज भारतीय बाजारपेठेतही तेजी दिसून येत आहे. विशेषतः आयटी शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, जपानचा निक्केई ५.६ टक्क्यांनी वाढला आहे.
आरबीआय एमपीसी बैठकीचे निर्णय ९ एप्रिल रोजी येणार आहेत, अशा परिस्थितीत रेपो दर २५ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजार सकारात्मक राहतो.
सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली आहे, ज्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वाढ दिसून येत आहे. या घसरणीत मोठे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले स्टॉक जोडत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. ते प्रति बॅरल $65 च्या खाली आले आहे. जो ऑगस्ट २०२१ मधील सर्वात कमी पातळी आहे. ट्रम्पच्या टॅरिफमुळे मोठी घसरण झाली आहे.
बीएसईच्या टॉप ३० स्टॉक्सपैकी, सर्व स्टॉक्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. सर्वात जास्त वाढ झोमॅटो आणि टायटनच्या शेअर्समध्ये झाली आहे, ज्यात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, एसबीआय, एलटी आणि एशियन पेंट्सचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले आहेत.
फाइव्ह स्टार बिझनेसचा शेअर ७ टक्क्यांनी वाढला आहे. पीजी इलेक्ट्रोपोस्टचे शेअर्स ६.३६ टक्क्यांनी, केन्स टेक्नॉलॉजीचे शेअर्स ५ टक्क्यांनी, पॉलिसी बाजारचे शेअर्स ६ टक्क्यांनी, एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स ६ टक्क्यांनी आणि बायकॉनचे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले आहेत.