'या' शेअर्समध्ये दिसून येईल मोठी हालचाल, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा यादी पहा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Share Market Marathi News: गेल्या मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मंदी होती. बुधवारी महाशिवरात्रीमुळे शेअर बाजार बंद होता. आज म्हणजेच गुरुवारी शेअर बाजार पुन्हा उघडला. आजच्या सत्रात, इंडिगो, भारती एअरटेल, विप्रो, स्पाइसजेट, कोफोर्ज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसह अनेक कंपन्यांचे शेअर्स अनेक बातम्यांमुळे फोकसमध्ये राहू शकतात, ज्यामुळे आज या शेअर्समध्ये हालचाल दिसून येऊ शकते.
विमान कंपनी इंडिगोने माहिती दिली आहे की त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटच्या संदर्भात सुमारे १४ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सध्या कंपनी या संदर्भात आवश्यक कायदेशीर उपाययोजनांचे मूल्यांकन करत आहे. यामुळे इंडिगो कंपनी सद्या चर्चेत आहे, ज्याचा परिणाम शेअर्स वर होऊ शकतो.
ब्रोकरेजशी संबंधित व्यवसायात सहभागी असलेल्या रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स आज व्यवहारात दिसू शकतात. खरं तर, रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे चार नवीन संचालक, अभय कुमार अग्रवाल, अर्जुन लांबा, गुरुमूर्ती रामनाथन आणि सुरेश महालिंगम यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनी बर्मन कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहे.
भारती एअरटेल आणि टाटा ग्रुप टाटा प्ले लिमिटेड अंतर्गत टाटाचा डीटीएच व्यवसाय एअरटेलची उपकंपनी भारती टेलिमीडिया लिमिटेडसोबत एकत्रित करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करत आहेत. सध्या या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.
टाटा पॉवरने आसाममध्ये ५००० मेगावॅटचा अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो त्यांच्या व्हेंचर शाखा “विप्रो व्हेंचर” ला सुमारे $200 दशलक्ष निधीच्या चौथ्या फेरीत देणार आहे. विप्रो व्हेंचरची स्थापना 10 वर्षांपूर्वी झाली होती.
रेलटेल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून दोन मोठे ऑर्डर मिळाले. या दोन्ही ऑर्डरची एकूण किंमत सुमारे १७० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
ऑनलाइन वित्तीय सेवा प्रदाता पेटीएम आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आहे, ज्यामध्ये पेटीएम कंपनी स्टार्टअप्सना मार्गदर्शनाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा समर्थन, बाजारपेठ प्रवेश आणि निधीच्या संधी प्रदान करेल.
गेल्या बुधवारी, विमान कंपनी स्पाइसजेटने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी डिसेंबर तिमाहीचे निकाल सादर केले. ज्यामुळे आज स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येते. स्पाइसजेट कंपनीने २०२५ या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत सुमारे २५ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे.
कोफोर्ज कंपनी ४ मार्च रोजी स्टॉक स्प्लिटबाबत निर्णय घेईल. ज्यामुळे आज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येऊ शकते.
वारी एनर्जीज कंपनीला आदित्य बिर्ला रिन्यूएबलची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ABREL EPC कडून सुमारे ४१० MWp सौर मॉड्यूलच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळाली आहे.
पेप्सिकोची फ्रँचायझी कंपनी वरुण बेव्हरेजेसने एसबीसी बेव्हरेजेस घानाच्या अधिग्रहणाची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२५ वरून ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने २६ फेब्रुवारी रोजी माहिती दिली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ५ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या बोर्ड बैठकीत बोर्ड सदस्य अंतरिम लाभांश देण्याबाबत निर्णय देऊ शकतात.