
Stock Market Today: भारतीय शेअर बाजारत आज 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांना देणार नफा! जाणून घ्या सविस्तर
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किचींत घसरण, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्या सविस्तर
मंगळवारी, भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली, बेंचमार्क निफ्टी ५० २६,००० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स ५०३.६३ अंकांनी म्हणजेच ०.५९% ने घसरून ८५,१३८.२७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १४३.५५ अंकांनी म्हणजेच ०.५५% ने घसरून २६,०३२.२० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी ४०७.५५ अंकांनी म्हणजेच ०.६८% ने घसरून ५९,२७३.८० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतणवूकदार आयआरएफसी, इंडिगो, इंडिया सिमेंट्स, हिंदुस्तान कॉपर, कॅनरा बँक, केपीआय ग्रीन, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, सीएट, मारुती सुझुकी, बिकाजी फूड्स इंटरनॅशनल या शेअर्सवर त्यांचा फोकस ठेऊ शकतात. तसेच बााजारातील काही तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करम्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. या तज्ज्ञांमध्ये सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) यांचा समावेश आहे. बाजारातील या तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड, वेदांत लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, बँक ऑफ इंडिया , बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड आणि व्हीए टेक वाबाग लिमिटेड यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांना आजच्या स्टॉक्सबाबत विचारले असता, त्यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये संवर्धन मदरसन, मिंडा कॉर्प आणि अलेम्बिक यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांना आजच्या स्टॉक्सबाबत विचारले असता, त्यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. या सॉक्समध्ये बिर्लासॉफ्ट, एसटीईएल होल्डिंग्ज, मिंडा कॉर्पोरेशन, जमना ऑटो इंडस्ट्रीज आणि स्टायलम इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.