Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात त्सुनामी… गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान, वाचा… कोणते शेअर्स घसरलेत!

मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 73 अंकांनी घसरून, 81,151 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 73 अंकांनी घसरून, 24,781 अंकांवर बंद झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 21, 2024 | 04:42 PM
शेअर बाजारात मोठी आपटी; एकच दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

शेअर बाजारात मोठी आपटी; एकच दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

Follow Us
Follow Us:

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या घसरणीच्या त्सुनामीमुळे सोमवारी (ता.२१) व्यापारी सत्रात या शेअर्सवर शोककळा दिसून आली आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावरून 1350 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक 415 अंकांनी घसरला आहे. बाजार बंद होताना मिडकॅप निर्देशांक 1000 अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक 300 अंकांनी घसरला. मात्र, सेन्सेक्स-निफ्टीतील घसरण फार मोठी नव्हती. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 73 अंकांनी घसरून, 81,151 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 73 अंकांनी घसरून, 24,781 अंकांवर बंद झाला आहे.

कोणत्या शेअर्समध्ये झाली घसरण

आज शेअर बाजारात प्रामुख्याने एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही मोठी घसरण झाली आहे. कोफोर्ज ५.५५ टक्के, व्होडाफोन आयडिया ५.५४ टक्के, एमआरपीएल ४.७९ टक्के, पर्सिस्टंट सिस्टम ४.५४ टक्के, आयओबी ४.२३ टक्के, हिंदुस्तान पेट्रोलियम ४.११ टक्के, पॉलीकॅब ३.९७ टक्के, बंधन बँक ३.९५ टक्के, एसबीआय ४.९५ टक्के, एसबीआय ४.९५ टक्के, कार बँक ३.९५ टक्के घसरण झाली आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – किती दिवसात धुतले जातात रेल्वेमधील चादर, ब्लँकेट्स..! धक्कादायक माहिती आलीये समोर, वाचा… सविस्तर

कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ

वाढत्या समभागांमध्ये टाटा केमिकल्स 8.77 टक्क्यांनी, ओबेरॉय रियल्टी 2.99 टक्क्यांनी, माझगाव डॉक्स 2.84 टक्क्यांनी, बीएसई 1.76 टक्क्यांनी, मॅक्स हेल्थ 1.34 टक्क्यांनी, पतंजली 0.79 टक्क्यांनी तेजीत असल्याचे पाहायला मिळाले.

गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 453.27 लाख कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 458.21 लाख कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Tsunami in the stock market investors lost 5 lakh crores stocks remained bullish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 04:40 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Stock Market: FII कडून भारतीय शेअर बाजारात ३३,३४० कोटींची गुंतवणूक; बँक निफ्टीची दमदार कामगिरी
1

Stock Market: FII कडून भारतीय शेअर बाजारात ३३,३४० कोटींची गुंतवणूक; बँक निफ्टीची दमदार कामगिरी

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
2

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?
3

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.