Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Share Market Update: आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण आज शेअर बाजार लाल रंगात उघडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 08:45 AM
Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम; आज सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता
  • Gift Nifty लाल निशाणावर; आज शेअर बाजारात घसरणीची शक्यता, गुंतवणूकदार सावध!
  • जागतिक तणावामुळे भारतीय बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीत नकारात्मक सुरुवातीचे संकेत
India Share Market Update: अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेले युद्ध आणि महागाई वाढण्याची भिती, यामुळे जागतिक बाजारात कमकुवत संकेत पाहायला मिळाले. याचाच परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, शुक्रवारी २७ मार्च रोजी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १८८ पॉइंट्सच्या सवलतीवर, २३,११२ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्यामुळे आज व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांसाठी खरेदीची मोठी संधी

रामनवमी २०२६ निमित्त शेअर बाजाराला सुट्टी असल्यामुळे, गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी बीएसई आणि एनएसई व्यापारासाठी बंद होते. बुधवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या सत्रात आपली तेजी कायम ठेवली आणि मोठ्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स १,२०५.०० अंकांनी, म्हणजेच १.६३ टक्क्यांनी वाढून ७५,२७३.४५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३९४.०५ अंकांनी, म्हणजेच १.७२ टक्क्यांनी वाढून २३,३०६.४५ वर स्थिरावला. बुधवारी बँक निफ्टी निर्देशांक १,१०२.४५ अंकांनी, म्हणजेच २.१० टक्क्यांनी वाढून ५३,७०८.१० अंकांवर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, एलआयसी, इन्फोसिस, इरेडा, आझाद इंजिनिअरिंग, चेन्नई पेट्रोलियम, भारत डायनॅमिक्स, सद्भाव इंजिनिअरिंग, एनएचपीसी, एचएफसीएल या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. कोटक सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष, अमोल आठवले यांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प कालावधीसाठी खरेदी करण्यासाठी वेदांता, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स आणि कॅनरा बँक यांची शिफारस केली आहे.

Bank Of Baroda UPI Overdraft: ग्रामीण महिलांना मोठा दिलासा; Bank of Baroda कडून नवीन सुविधा सुरू, जाणून घ्या सविस्तर.. 

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया म्हणाले की, आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार कर्नाटक बँक, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी हे शेअर्स खरेदी करण्यावर फोकस करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सीमलेस, सॅजिलिटी आणि झेन टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Us iran tensions impact indian stock market sensex and nifty likely to open lower share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! सपाट पातळीवर उघडणार शेअर बाजार… स्टॉक्स खरेदीपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! सपाट पातळीवर उघडणार शेअर बाजार… स्टॉक्स खरेदीपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी… एकेकाळी 10 रुपयांपेक्षाही कमी होती किंमत, आता ‘हा’ स्टॉक बनला पैसे छापण्याची मशीन
2

1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी… एकेकाळी 10 रुपयांपेक्षाही कमी होती किंमत, आता ‘हा’ स्टॉक बनला पैसे छापण्याची मशीन

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस
3

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
4

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.