Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती; पाहा… फर्स्ट लूकचा व्हिडीओ!

पुढील 3 महिन्यात देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहेत. यासाठी बंगळुरू येथील वंदे भारत ट्रेन तयार होणाऱ्या कंपनीत वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) येथे भेट देऊन स्लीपर वंदे भारतची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 01, 2024 | 02:46 PM
पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती; पाहा... फर्स्ट लूकचा व्हिडीओ!

पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती; पाहा... फर्स्ट लूकचा व्हिडीओ!

Follow Us
Close
Follow Us:

वंदे भारत ट्रेन भारतीयांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ज्यामुळे सध्या भारतीयांचा प्रवास सुखकर होत आहे. अशातच आता भारतीयांची वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 3 महिन्यात देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहेत. यासाठी बंगळुरू येथील वंदे भारत ट्रेन तयार होणाऱ्या कंपनीत वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) येथे भेट देऊन स्लीपर वंदे भारतची पाहणी केली आहे. यावेळी पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

वंदे भारत ट्रेनची संख्या 102 वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 31 ऑगस्ट रोजी देशातील आणखी 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे देशातील वंदे भारत ट्रेनची संख्या 102 इतकी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या नवीन तीन वंदे भारत ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनऊ या मार्गावर धावणार आहेत. दरम्यान, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालू वर्षाच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशी माहिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक यू सुब्बा राव यांनी अलिकडेच दिली होती. त्यानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल, असे विधान करत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

हे देखील वाचा – तब्बल 47,500 कोटी संपत्तीची मालकीन, वाचा… कोण आहे ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला!

#WATCH | Bengaluru, Karnataka | Railway Minister Ashwini Vaishnaw says, “A lot of things have been taken care of in this coach…Four trains, Vande Chair Car, Vande Sleeper, Vande Metro and Amrit Bharat have been designed in a way to address many things, like modern technology,… https://t.co/e8YI0nDmEW pic.twitter.com/dq2UwMxY0j

— ANI (@ANI) September 1, 2024

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक समोर

देशात पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर या मार्गावर महाराष्ट्रात धावली. त्यानंतर, वंदे भारत ट्रेनचा सुरू असलेला पल्ला वाढत असून देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून तब्बल 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून, कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली. यावेळी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाइपचे अनावरण रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

Web Title: Vande bharat sleeper train run in next 3 months information of railway minister first look video in front

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • Railway Minister

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.