Vikram Solar: 'ही' कंपनी बॅटरी उत्पादनात आघाडीवर, या बॅटरची क्षमता ५ गिगावॅट तासापर्यंत शक्य (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Vikram Solar Marathi News: भारतातील सर्वात मोठ्या सोलर फोटो-व्होल्टेइक (“पीव्ही”) मॉड्यूल उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या विक्रम सोलरने स्वमालकीच्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (बीएमएस) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक गिगावॅट तास क्षमतेच्या सॉलिड-स्टेट सेल आणि बॅटरी असा एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला ५ गिगावॅट तासापर्यंतच्या क्षमतेपर्यंत वाढविता येणारा हा प्रकल्प वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक बाजारपेठेतील वाढत्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करेल, असा कंपनीला ठाम विश्वास आहे.
विक्रम सोलरचा हा प्रकल्प उच्च पातळीच्या कामगिरीसह शाश्वत, नाविन्यपुर्ण बॅटरीचा पर्याय सादर करत ऊर्जा साठवणूकीच्या क्षेत्रात आपले योगदान देण्यास सज्ज आहे. सोलर पीव्ही मॉड्युलच्या उत्पादनाबाबत विक्रम सोलरकडे असलेला अनुभव आणि सॉलिड स्टेट बॅटरी तंत्रज्ञान या दोघांचा मिलाफ स्वच्छ आणि ग्रीन भविष्यासाठी योगदान देण्याची कंपनीला अपेक्षा आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आणि आर्थिक विकासाला सुध्दा हा मिलाफ चालना देईल, अशी अपेक्षा आहे.
विक्रम सोलरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश चौधरी या नवीन योजनेबाबत भाष्य करताना म्हणाले, भारताच्या अक्षय उर्जा परिवर्तनात योगदान देण्यासाठी विक्रम सोलर नेहमीच कार्यरत असून अतिशय मोठ्या प्रमाणात सौर उर्जेचा अवलंब होण्यासाठी कंपनी चालना देत आहे. आम्ही तयार केलेल्या सॉलिड स्टेट बॅटरीतील बहुतांश घटक हे भारतात विकसित त्याचबरोबर उत्पादीत केलेले असल्याने आत्मनिर्भरता या सरकारच्या उद्दीष्टाला सहाय्य करते आणि भारताच्या अक्षय ऊर्जा आणि हवामानविषयक उद्दीष्टांशी सुसंगतही आहेत. आमचे भागीदार एन्टिटी२ एनर्जी स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेडकडे नॉन-लिथियम सॉलिड-स्टेट बॅटरी तंत्रज्ञानाचे अनेक पेटंट आहे. त्यांच्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाढीव क्षमतेच्या बॅटरी तयार करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. क्रिसिलच्या अहवालानुसार, सध्या भारत आपल्या एकूण वीज गरजेचा फक्त १५ ते २०% हिस्सा अक्षय ऊर्जेच्या आधारे पूर्ण करतो. २०३० पर्यंत त्याच्या उर्जेच्या गरजांपैकी ५०% हिस्सा अक्षय ऊर्जेच्या आधारे पूर्ण करण्याचे सुधारित लक्ष्य भारताने आखलेले आहे. विविध ऊर्जांच्या मिश्रणात परिवर्तनशील उर्जा निर्मितीचे हे उच्च प्रमाण गाठण्यासाठी, बॅटरीच्या माध्यमातून वीज साठविण्यासाठी अतिरिक्त गुंतवणुक आवश्यक ठरणार आहे.
देशाच्या या गरजेला आम्ही दिलेला प्रतिसाद म्हणजे विक्रम सोलरचे पॉवरहाइव्ह बॅटरी स्टोरेज ही सुविधा होय. क्रिसिलच्या अहवालानुसार, २०२५ ते २०३० दरम्यानच्या आर्थिक वर्षात बॅटरी एनर्जी स्टोरेज यंत्रणेमध्ये (BESS) २३ ते २४ गिगावॅट क्षमतेची भर पडण्याचा अंदाज आहे.”
इलेक्ट्रोएक्टिव्ह धातूचे कमीत कमी नुकसान बॅटरींना अधिक वीज साठवण्यास सक्षम करते.
बॅटरीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर औष्णिक आणि अग्नि अशा दोन्ही दृष्टीने सुरक्षित आहे.
तापमानची विस्तृत श्रेणी आणि वेगवेगळ्या कामकाज परिस्थितीत या बॅटरी कार्यरत राहतात. परिणामी बँटऱ्यांमध्ये डेन्ड्राईटचा थर तयार होत नाही. चार्जिगच्या १०,००० वेळा (सायकल) इतक्या दीर्घ आयुष्यासाठी बॅटरी स्थिररित्या कामकाज करतात.
बहुतेक कच्चा माल भारतातलाच असल्याने पुरवठा साखळीतील लवचिकता सुनिश्चित झाली आहे आणि स्थानिक उद्योगांना आधारही मिळालेला आहे.
संपूर्ण उत्पादन पुनर्वापर करण्यायोग्य तसेच पर्यावरणपूरक आहे. ते धोकादायक नसलेल्या घटकांपासून तयार करण्यात आल्याने पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी झालेले आहेत.
ऊर्जा साठवणूकीसाठी योग्य पर्याय कंपनीने विकसित केल्याने जगभरातील ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वततेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कंपनी आपले योगदान देत आहे. चोवीस तास स्वच्छ ऊर्जेची मागणी वाढलेली असताना बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स (BESS) ही यंत्रणा कार्यक्षम ऊर्जा साठवणुकीसाठी एक महत्त्वाचा पर्याय सादर करते. बीईएसएसला आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करताना विक्रम सोलरचा उद्देश वीज निर्मिती आणि साठवणुक यांचा मिलाफ घडविणारा एकात्मिक पर्याय प्रदान करणे हा आहे. त्यामुळे वन-स्टॉप पर्याय प्रदान करणारी कंपनी म्हणून आमचे स्थान आणखी उंचावणार आहे. आमच्या विद्यमान भागीदारांचे देशभरात परसलेले जाळे तसेच आमची संशोधन आणि विकास क्षमता आम्हाला बॅटरी केमिस्ट्रीमध्ये क्रांती घडवून आणणारा आविष्कार विकसित करण्याच्या बाबतीत स्पर्धात्मक फायदा प्रदान करत आहे.