Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? त्यापूर्वी वाचा हा महत्त्वाचा अहवाल

Gaming IPO: माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, गेम डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (जीडीएआय) आणि नजारा टेक्‍नॉलॉजीज यांच्‍यासोबत सहयोगाने विंझोच्‍या जीडीसी येथे इंडिया पॅव्हेलियनच्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी हा

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 19, 2025 | 06:03 PM
अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? त्यापूर्वी वाचा हा महत्त्वाचा अहवाल (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? त्यापूर्वी वाचा हा महत्त्वाचा अहवाल (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Gaming IPO Marathi News: भारतीय ऑनलाइन गेमिंग कंपन्या सार्वजनिक बाजारपेठेत नोंदणीसाठी स्वतःला सज्ज करत आहेत आणि येत्या काही वर्षांत गुंतवणूकदारांकडून २६ बिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अनलॉक करतील, असे आज गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स (जीडीसी) येथे भारतातील सर्वात मोठे इंटरॅक्टिव्ह एंटरटेन्‍मेंट प्लॅटफॉर्म बिंझो गेम्स (विंझो) आणि इंटरअॅक्टिव्ह एंटरटेनमेंट अँड इनोव्हेशन कौन्सिल (आयईआयसी) यांनी सादर केलेल्या नवीन अहवालात म्हटले आहे.

आज सॅन फ्रान्सिस्कोच्या जीडीसी येथील इंडिया पॅव्हेलियनच्या दुसऱ्या पर्वामध्‍ये लाँच करण्यात आलेल्या इंडिया गेमिंग मार्केट रिपोर्टच्या २०२५ एडिशनमध्‍ये भारताच्या ३.७ बिलियन डॉलर्सच्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राच्या मजबूत वाढीला चालना देणाऱ्या घटकांचा सखोल आढावा देण्यात आला आहे. या क्षेत्राची वाढ १९.६ टक्‍के सीएजीआरने (आर्थिक वर्ष २०२४-२९) होण्याची अपेक्षा आहे आणि २०२९ पर्यंत ते ९.१ बिलियन डॉलर्सच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचेल. डॉ. श्रीकर रेड्डी (सॅन फ्रान्सिस्को येथील भारताचे कॉन्सुल जनरल) आणि विंझोचे सह-संस्थापक सौम्या सिंग राठोड व पावन नंदा यांनी हा अहवाल लाँच केला.

BPCL अंकुर फंड अंतर्गत सुरू होणार ‘इमर्ज’ कोहॉर्ट, काय आहे प्रकल्प?

या अहवालानुसार, भारतातील एकमेव सार्वजनिकरित्या सूचीबद्ध गेमिंग कंपनी नजारा जागतिक स्तरावर सूचीबद्ध गेमिंग कंपन्यांमध्ये सर्वाधिक प्रीमियम देते. सध्याच्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राच्या ३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्‍या बाजारपेठ आकारावर लागू केलेल्या समान गुणकांवरून आयपीओद्वारे अनलॉक होण्याची वाट पाहत असलेले गुंतवूणकदार किमान २६ बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करण्‍याचा अंदाज आहे. बाजारपेठ २०२९ पर्यंतच्‍या ९.१ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्‍या अंदाजापर्यंत पोहोचले की, ६३ बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकदार मूल्‍याचा फायदा घेईल.

या अहवालात भारतीय गेमिंग क्षेत्राच्या मजबूत मुलभूत बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतात ५९१ दशलक्ष गेमर्स आहेत (जागतिक गेमर्सपैकी जवळपास २० टक्‍के), गुगल प्लेस्टोअरला पर्याय असलेले जवळपास ११.२ बिलियन मोबाइल गेम अॅप डाऊनलोड्स आहेत आणि जवळपास १,९०० गेमिंग कंपन्या आहेत, ज्यात १३०,००० अत्यंत कुशल व्यावसायिक आहेत. या क्षेत्राला ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा एफडीआय मिळाला आहे, त्यापैकी ८५ टक्‍के एफडीआय पे-टू-प्ले विभागाला देण्‍यात आला आहे, कारण त्‍यांच्‍यामध्‍ये भारतातील गेमिंग मालमत्तेमधून कमाई करण्‍याची क्षमता आहे, जी एकेकाळी भारतातील गेमिंग क्षेत्रासाठी दीर्घ समस्या होती. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, भरभराटीच्या गेम डेव्हलपर इकोसिस्टम आणि अनुकूल नियामक व्यवस्थेसह २०३४ पर्यंत या क्षेत्राला ६० बिलियन अमेरिकन डॉलर्सचा बाजारपेठ आकार साध्य करण्यास मदत करेल, ज्यामध्ये २० दशलक्षांहून अधिक रोजगारांची निर्मिती, वाढलेले एफडीआय आणि भारतीय आयपीची निर्यात यांचा समावेश आहे. ते २०२९ पर्यंत भारताचा सध्याचा गेमिंग वापरकर्तावर्ग जगातील सर्वात मोठा करत ९५२ दशलक्ष पर्यंत वाढवतील.

”भारत जागतिक गेमिंग आणि तंत्रज्ञान परिसंस्थेत उल्लेखनीय परिवर्तनाच्या टप्‍प्‍यावर आहे,” असे डॉ. श्रीकर रेड्डी (सॅन फ्रान्सिस्को येथील भारताचे कॉन्सुल जनरल) म्हणाले. ”सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपल्या देशाचे गेमिंग क्षेत्र मनोरंजनाचे पॉवरहाऊस असण्‍यासोबत तंत्रज्ञान नाविन्‍यता, रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीचे महत्त्वाचे स्रोत देखील आहे. इंडिया गेमिंग मार्केट रिपोर्टमध्ये भविष्यात येणाऱ्या व्‍यापक संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, तसेच आमच्या ऑनलाइन गेमिंग उद्योगात गुंतवणूकदार २५-३० बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक अनलॉक करण्याचा अंदाज वर्तवण्‍यात आला आहे. डिजिटल पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी माननीय पंतप्रधानांच्या दृढ पाठिंब्यामुळे भारताला तंत्रज्ञान व गेमिंग बाजारपेठेत जागतिक प्रमुख म्हणून स्थान मिळाले आहे.”

”भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योग अभूतपूर्व वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्याला २०२९ पर्यंत ९.१ बिलियन अमेरिकन डॉलर्सची अंदाजित बाजारपेठ आकाराचे पाठबळ आहे, तसेच २०२९ पर्यंत ६३ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत गुंतवणूकदार मूल्य अनलॉक करण्याची क्षमता आहे. इंडिया गेमिंग मार्केट रिपोर्ट आणि जीडीसी येथील इंडिया पॅव्हेलियन हे दोन्ही जागतिक गेमिंग लँडस्केपमध्ये आपल्या देशाच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतात, ज्‍यामधून स्वदेशी गेमिंग कंपन्यांची नाविन्‍यता आणि व्‍याप्‍ती दिसून येते. आम्‍ही तंत्रज्ञान नाविन्‍यता, आयपी निर्मिती आणि सहभागासंदर्भातील मर्यादांना दूर करत असताना विंझो भारताला जागतिक गेमिंग पॉवरहाऊस बनवण्‍याप्रती कटिबद्ध आहे,” असे विंझोचे पावन नंदा म्हणाले.

आयजीएमआर २०२५ मध्ये भारतातील डायनॅमिक मोबाइल-फर्स्‍ट आणि युवा-संचालित ऑनलाइन गेमिंग बाजारपेठेचा देखील शोध घेण्यात आला आहे, जी सध्या ३०० बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या जागतिक बाजारपेठेपैकी फक्‍त १.१ टक्‍के आहे आणि व्‍यापक वाढीची क्षमता देते. भारतीय गेमर्स प्रादेशिक भाषांमध्ये विकसित केलेल्या कॅज्युअल आणि हायपर कॅज्युअल गेम्‍सना जास्त पसंती देतात, ज्यामुळे ‘मेड इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’ या भारतीय कन्‍टेन्‍टची पुन्‍हा सुरूवात होत आहे. भारतीय इंडी गेमिंग आयपीची निर्यात या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. इंडिया पॅव्हेलियन आणि जीडीसीमधील पॅव्हेलियनमध्ये भारतीय टॅलेंटचे प्रदर्शन आता भारतीय गेम डेव्हलपर्सना जागतिक गेमिंग समुदायाशी जोडणारी विंझो-नेतृत्वाखालील परंपरा बनली आहे.

जगातील सर्वात मोठी गेमिंग कॉन्फरन्स असलेल्या जीडीसी येथील इंडिया पॅव्हेलियनमध्ये हा अहवाल लाँच करण्‍यात आला, जो गेमिंग इकोसिस्टममध्ये भारताच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी वैविध्‍यपूर्ण केंद्र म्हणून काम करतो, ज्यामध्ये विंझो सारख्या प्रमुख कंपन्यांपासून ते इंडी डेव्हलपर्सपर्यंतचे गेम्‍स साइड बाय साइड प्रदर्शित केले जातात. विंझो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, जीडीएआय आणि नजारा टेक्‍नॉलॉजी यांनी यांनी संयुक्‍तपणे इंडिया पॅव्हेलियनची स्थापना केली होती. विंझोद्वारे प्रदर्शित केलेले गेम डेव्हलपर्स विंझोची प्रमुख गेम डेव्‍हलपमेंट कॉम्‍पीटिशन ‘भारत टेक ट्रायम्‍फ प्रोग्राम’च्या तिसऱ्या पर्वाचे विजेते होते, जेथे विजेत्या डेव्हलपर्सना जगातील सर्वात मोठ्या गेमिंग कॉन्फरन्समध्ये त्यांचे गेम्‍स प्रदर्शित करण्याची संधी दिली जाते. भारतातील आणि जागतिक स्तरावरील गेम डेव्हलपर्सना मार्गदर्शन, संसाधने आणि आंतरराष्‍ट्रीय प्रदर्शन प्रदान करून सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल्या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वातील विजेते जीडीसीच्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये एकत्र आले होते, तसेच ते भारतातील आगामी स्टार्टअप महाकुंभ (एप्रिल २०२५) आणि वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्‍मेंट समिट (डब्‍ल्‍यूएव्‍हीईएस) (मे २०२५) मध्ये त्यांचे गेम्‍स देखील प्रदर्शित करतील.

भारतातील ५३ अ‍ॅप्सपैकी ५२ अ‍ॅप्स फसवे, अहवालातून खुलासा

Web Title: Want to invest in the us stock market read this important report before doing so

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • Business News
  • IPO News
  • share market news

संबंधित बातम्या

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त
1

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

बिल गेट्सने दान केले रू. 7,22,14,68,00,000, कोणाच्या खात्यात झाले जमा?
2

बिल गेट्सने दान केले रू. 7,22,14,68,00,000, कोणाच्या खात्यात झाले जमा?

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?
3

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?

How to become Rich in 2026: 5 सवयी ज्यामुळे तुम्ही व्हाल ‘करोडपती’, यावर्षीच करा ‘या’ गोष्टींचा प्रारंभ
4

How to become Rich in 2026: 5 सवयी ज्यामुळे तुम्ही व्हाल ‘करोडपती’, यावर्षीच करा ‘या’ गोष्टींचा प्रारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.