भारतातील ५३ अॅप्सपैकी ५२ अॅप्स फसवे, अहवालातून खुलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारतीय जाहिरात उद्योगातील उच्च मानक राखण्यासाठी तसेच जनहिताच्या दृष्टीने जबाबदार, नैतिक जाहिरात पद्धतींच्या निश्चितीसाठी एएससीआय सातत्याने करत असलेले प्रयत्न यातून दिसून येतात. विविध संबंधितांशी सहयोग करून अधिक प्रगतीशील जाहिरातदारीचा आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल २०२३ मध्येही एएससीआयला एक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एक नीतीमत्तापूर्ण व समावेशक जाहिरात परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांची क्षमता बांधणी करण्याप्रती एएससीआय अकॅडमीची बांधिलकी या पुरस्कारांतून दिसून येते.
‘डीईआयवर सातत्याने काम करून प्रगतीशील जाहिरात कथनांना आकार देण्यासाठी’ दिला जाणारा ‘डीईआय पुरस्कार’ भारतीय जाहिरातदारीमध्ये वैविध्य, समता व समावेशकता यांना बढावा देण्याच्या एएससीआय अकॅडमीच्या चिरंतन प्रयत्नांचा गौरव करतो. एएससीआय यासाठी दरवर्षी राबवत असलेले प्रकल्प आणि त्यांचा सातत्यपूर्ण कार्यप्रवाह यांची दखल हा पुरस्कार घेतो. त्यामुळेच जाहिरातींमधील वैविध्य व समावेशन या क्षेत्रांत एएससीआय हा महत्त्वपूर्ण सहभागी सदस्य व वैचारिक नेता ठरत आहे. हा प्रवास २०२१ मध्ये ‘जेंडर नेक्स्ट’सह सुरू झाला. यामध्ये भारतातील जाहिरातींमधील स्त्रियांच्या साचेबद्ध भूमिकांवर काम करण्यात आले, त्यापाठोपाठ कंटारच्या सहयोगाने जेंडरगेन्स श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये प्रगतीशील चित्रणांमुळे होणारा लाभ (आरओआय) दाखवण्यात आला. २०२३ मध्ये एएससीआयने दोन मूलगामी अभ्यासांद्वारे कार्यक्षेत्र विस्तारले. यापैकी ‘मेनस्ट्रीमिंग डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजिवनेस इन अॅडव्हर्टायजिंग (वैविध्य व समावेशकता जाहिरातींच्या मुख्य प्रवाहात आणणे)’ या विषयावर ७ डिसेंबर, २०२३ रोजी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
कंटारच्या आणि अनस्टिरिओटाइप अलायन्स (यूए) यांच्या सहयोगाने करण्यात आलेला हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच अहवाल होता. यामध्ये सर्व वांशिकता, एलजीबीटीक्यूआय+ समुदाय, विकलांगता, वयोगट व वर्ण (त्वचेचा रंग) यांच्या जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या वैविध्याचे परीक्षण करण्यात आले. या अभ्यासात आढळलेल्या माहितीच्या आधारे एएससीआयने यूएच्या सहयोगाने डीअँडआय एज समिटचे आयोजन केले. यामध्ये २००हून अधिक व्यावसायिक व ३५ तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात आले होते. सहभागी झालेल्यांमध्ये कार्यकर्ते, मार्केटिंग तज्ज्ञ, चित्रपटकर्ते व अभिनेते आदींचा समावेश होता. २०२४ मध्ये एएससीआयने भारतीय माध्यमांमधील व जाहिरातींमधील पुरुषत्वाच्या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी दर्जेदार अभ्यास सुरू केला. या अभ्यासाचा अहवाल १९ मार्च २०२५ रोजी ग्लोबल अड्डा कार्यक्रमात प्रकाशित केला जाणार आहे.
दुसरे ‘एक्सलन्स अवॉर्ड’ एएससीआय अकॅडमीच्या एका आद्य अभ्यासाला मान्यता प्राप्त करून देतो. ‘कॉन्शस पॅटर्न्स: अ स्टडी ऑफ डिसेप्टिव पॅटर्न्स इन टॉप इंडियन अॅप्स’ या शीर्षकाअंतर्गत हा अभ्यास केला गेला. भारतात फसव्याच्या नमुन्यांचे (डार्क पॅटर्न्स) प्रचलन कसे झाले याचा अभ्यास करणारा तसेच या परिस्थितीचे मापन करण्यासाठी व ती सुधारण्यासाठी साधने विकसित करणारा हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या अभ्यासामध्ये २१ अब्ज डाउनलोड्स असलेल्या भारतातील आघाडीच्या अॅप्सचा अभ्यास १२००० स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून करण्यात आला. भारतातील ५३ आघाडीच्या अॅप्सपैकी ५२ अॅप्स फसवे नमुने अर्थात डार्क पॅटर्न्सचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. त्यातही खासगीत्वाबाबत फसवणूकीचे प्रमाण भारतीय अॅप्समध्ये सर्वाधिक आढळून आले. नासकॉम, ब्रॉडबॅण्ड इंडिया फोरम आणि डीपीओ क्लब यांसारख्या कंपन्यांशी झालेल्या सहयोग करारांमधून एएससीआयची समावेशकता व तंत्रज्ञानात्मक सहयोग यांप्रती बांधिलकी दिसून येते.
• ५३ पैकी ५२ अॅप्समध्ये किमान एक फसवा नमुना दिसून आला.
• खासगीत्वाबाबत फसवणूक (प्रायव्हसी डिसेप्शन) या उल्लंघनाचे प्रचलन सर्वाधिक म्हणजे ७९ टक्के होते.
• १०० टक्के म्हणजे सर्व ई-कॉमर्स अॅप्समध्ये खाते डिलीट करण्यात अडथळे आणले जातात असेही या अभ्यासामध्ये निदर्शनास आले, तसेच आरोग्य-तंत्रज्ञानाशी संबंधित ८० टक्के अॅप्समध्ये खोटी निकड (अर्जन्सी) दाखवण्याच्या क्लृप्तीचा वापर केलेला आढळला.
मुंबईत यंदा झालेल्या आयसीएएस ग्लोबल डायलॉग्ज समिटच्या पहिल्या दिवशी एएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिवांनी हे पुरस्कार स्वीकारले. या शिखर परिषदेच्या निमित्ताने १७ हून अधिक आयसीएएस सदस्य राष्ट्रांमधील स्वयंनियामक यंत्रणांचे तसेच आघाडीच्या जाहिरात संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. ज्ञानाचे आदानप्रदान करणे, जागतिक मानकांना आकार देणे आणि उद्योगक्षेत्रात जबाबदार जाहिरात पद्धतींना चालना देणे यांसाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. जाहिरातीमधील एआयचा वापर, पुरुषत्व (मस्क्युनॅलिटी) व तिचे प्रतिनिधीत्व, डिजिटल जाहिरातींमधील विश्वासाची जोपासना आणि जाहिरात परिसंस्थेला आकार देण्यातील आव्हाने व संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत चर्चा होत आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना मनीषा कपूर म्हणाल्या, “हा पुरस्कार स्वीकारणे आमच्यासाठी खूपच सन्मानास्पद बाब आहे. भारतात जाहिरातदार अधिक जबाबदार व प्रगतीशील करण्यासाठी एएससीआय करत असलेल्या प्रयत्नांना मिळालेली ही पावती आहे. तज्ज्ञ सहयोगी आणि संबंधितांसोबत काम केल्यामुळे आम्हाला चाकोरीबाह्य काम करणे शक्य होत आहे. आमच्या मते हे काम जाहिरात परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षणीय कामे करून पुरस्कार मिळवणाऱ्या अन्य सर्व विजेत्या एसआरओंचेही आम्ही अभिनंदन करतो.”
जाहिरात मानकांच्या क्षेत्रात एएससीआयने तयार केलेल्या वैचारिक वारशाच्या पायावर या दोन पुरस्कारांनी कळस चढवला आहे. मागील आयसीएएस ग्लोबल अॅवॉर्ड्समध्ये एएससीआयला वैचारिक नेतृत्वासाठी मिळालेल्या पुरस्कारांमधून हे सिद्ध होते. एएससीआय व एएससीआय अकॅडमी अत्यंत प्रभावी व भविष्यकाळासाठी उपयुक्त काम करत आहेत, हे या सातत्यपूर्ण मान्यतेतून दिसून येते.
पुरस्कारप्राप्त अन्य एसआरओंमध्ये एएसए यूकेला शाश्वततेवरील कामासाठी गौरवण्यात आले, दक्षिण आफ्रिकेला प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी पुरस्कार प्राप्त झाला, इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमधील सर्वोत्तम पद्धतींसाठी रोमानियाला पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर नेदरलॅण्ड्सला इन्फ्लुएन्सर परिसंस्थेमध्ये सर्वसमावेशक व नवोन्मेष्कारी प्रयत्नांबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब्राझीलला विशेष मान्यता पुरस्कार प्राप्त झाला.