Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्सनल लोन घेताना काय काळजी घ्यावी, कर्जदारांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या…

वैयक्तिक कर्ज मिळवणे सोपे आहे. मात्र, वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नंतर अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. याच पार्श्वभुमीवर आज आपण पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, याबाबत जाणून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 08, 2024 | 07:27 PM
Rising Debt Burden on American Citizens: What is the Benefit of Trump's 'America First' Slogan?

Rising Debt Burden on American Citizens: What is the Benefit of Trump's 'America First' Slogan?

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा अचानक पैशाची गरज भासते. तेव्हा लोक सहसा वैयक्तिक कर्ज घेण्याच्या पर्यायाचा विचार करतात. वैयक्तिक कर्ज मिळणे सोपे आहे. अनेक वेळा बँका ग्राहकांना फोन करून वैयक्तिक कर्ज घेण्याबाबत बोलतात. अनेकदा लोक कर्ज घेताना काही चुका करतात. ज्यामुळे त्यांना नंतर अडचणींना सामोरे जावे लागते. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नंतर अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. याच पार्श्वभुमीवर आज आपण पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, याबाबत जाणून घेणार आहोत…

वैयक्तिक कर्ज हे महागडे कर्ज

वैयक्तिक कर्ज हे एक महागडे कर्ज आहे. त्याचा व्याजदर गोल्ड लोन आणि होम लोनपेक्षा खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही बँक किंवा एनबीएफसीकडून कर्ज घेण्यापूर्वी, त्याचे व्याजदर काळजीपूर्वक तपासून घ्यावे. अगदी एक टक्का व्याजदराचा फरक तुमच्या ईएमआयमध्ये मोठा फरक करू शकतो. कर्ज घेण्यापूर्वी सर्व बॅंकांच्या व्याजदरांची योग्य प्रकारे तुलना करा. वेगवेगळ्या बँका आणि एनबीएफसीचे दर ऑनलाईन तपासल्यानंतरच वैयक्तिक कर्ज घेण्याचा निर्णय घ्या.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – 26,00,000 कोटींची संपत्ती… हे आहे जगातील सर्वात श्रीमंत कुटूंब; अंबानी-अदानींची एकत्रित संपत्तीही नाही तितकी!

कर्ज परतफेडीचा अवधी माहिती असावा

ज्या बँका किंवा एनबीएफसीकडून तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळते. त्यांच्याकडून वैयक्तिक कर्ज घ्यावे. तुमचे आधीच त्या बँकेत खाते असल्यास, तुम्हांला नवीन अर्ज भरण्याची गरज नाही आणि बँक तुमच्या क्रेडिट इतिहासाद्वारे तुमचे कर्ज सहजपणे मंजूर केले जाईल. कर्ज घेताना, तुम्ही बँक किंवा एनबीएफसीची परतफेड सुविधा तपासली पाहिजे. बँक तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी किती वेळ देत आहे. हे तुम्हाला माहीत असणे खुप आवश्यक आहे.

अल्प मुदतीच्या कर्जावर ईएमआय जास्त

कर्जाच्या कालावधीनुसार ईएमआय निश्चित केला जातो. अल्प मुदतीच्या कर्जावर ईएमआय जास्त आणि व्याज कमी असते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार परतफेडीची सुविधा निवडू शकतात. कर्ज घेत असताना, प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कांची माहिती घेणे देखील आवश्यक आहे. अनेक वेळा कर्ज घेताना ग्राहक हे लक्षात ठेवत नाहीत. यामुळे त्यांना नंतर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वरील सर्व बाबी लक्षात घेऊनच कर्ज घेण्याची प्रक्रिया पुर्ण करा.

Web Title: What to be careful about while taking personal loan borrowers must know these things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 07:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.