Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा मंदीचा माहोल! Sensex आणि Nifty खाली येण्याची शक्यता, गुंतवणूकदारांना पुन्हा धक्का?
७ ऑक्टोबर रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक पातळीवर झाली होती. मात्र सुरुवात मंद झाली असली तरी देखील शेअर बाजार वाढीसह बंद झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला तर शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक पातळीवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज देखील ८ ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२१२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३ अंकांनी कमी होता. मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने सलग चौथ्या सत्रात तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,१०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स १३६.६३ अंकांनी म्हणजेच ०.१७% ने वाढून ८१,९२६.७५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३०.६५ अंकांनी म्हणजेच ०.१२% ने वाढून २५,१०८.३० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १३४.५० अंकांनी किंवा ०.२४% ने वाढून ५६,२३९.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टायटन, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, कॉन्कोर, बजाज फिनसर्व्ह, आयडीबीआय बँक, बजाज ऑटो, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, पेटीएम, केपीआयटी टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी टोरेंट पॉवर, इंजिनिअर्स इंडिया आणि ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या शेअर्सची शिफारस केली आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ट्रान्सरेल लाइटिंग, डॉ. अग्रवाल हेल्थ केअर, इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स, आदित्य इन्फोटेक आणि प्रिसिजन वायर्स इंडिया यांचा समावेश आहे.
बाजारातील तज्ञ – चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एथर एनर्जी लिमिटेड, यूएनओ मिंडा लिमिटेड, बीएसई लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक , हाय-टेक पाईप्स लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) आणि ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड यांचा समावेश आहे.