Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps
CERT-In ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, गूगलच्या वेब ब्राऊझर क्रोममध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स युजर्सचे डिव्हाईस एक्सेस करू शकतात आणि याचा परिणाम युजर्सच्या डेटावर होऊ शकतो. सिक्योरिटी रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, क्रोममध्ये अनेक टेक्नीकल ग्लिच देखील पाहायला मिळत आहेत. यामध्ये व्हिडीओ आणि वेब जीपीयूमध्ये मेमरी ओवरफ्लो, स्टोरेज आणि टबमध्ये डेटा लीक आणि चुकीच्या कोडींगसोबतच फाईलची चुकीची रीडिंग आणि V8 मध्ये एररसह काही आणखी बग्स देखील पाहायला मिळू शकतात. या बग्सच्या मदतीने हॅकर्स अगदी सहजपणे यूजर्सचा कम्प्यूटर एक्सेस करू शकतात. या बग्सच्या मदतीने हॅकर्स युजर्सना कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवर रिडायरेक्ट करू शकतात, जे अतिशय धोकादायक असू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्रोम वापरणाऱ्या सर्व युजर्सना या बग्सचा धोका आहे. क्रोमच्या Windows किंवा Linux सिस्टमचा वापर करणाऱ्या युजर्सना या बग्सच्या मदतीने हॅकर्स लक्ष्य करू शकतात. Linux मध्ये क्रोमचे 141.0.7390.54 वर्जन किंवा यापूर्वीचे वर्जन वापरणाऱ्या युजर्सना या बग्सचा धोका आहे. त्याच वेळी, विंडोज आणि मॅकवर 141.0.7390.54/55 पेक्षा आधीच्या क्रोम वर्जन वापरणाऱ्या यूजर्सना धोका आहे.
Chrome यूजर्सना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि बग्सपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लगेचच सॉफ्टवेअर अपडेट करावं लागणार आहे. क्रोमचा सॉफ्टवेयर अपडेट करण्यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
क्रोम कोणत्या कंपनीचे मालकीचे वेब ब्राऊझर आहे?
गुगल
गुगल क्रोमचे किती युजर्स आहेत?
सुमारे 3.45 बिलीयन






