Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे मोहिनी? नावावर Ratan Tata यांनी ठेवली 500 कोटींची संपत्ती, काय आहे बिझनेस

रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला असून ट्रॅव्हल बिझनेस २०१३ मध्ये ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाल्याचे समोर आले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 07, 2025 | 11:30 AM
टाटा ग्रुपमध्ये हिस्सा मिळणारे मोहिनी मोहन दत्ता कोण (फोटो सौजन्य - Instagram)

टाटा ग्रुपमध्ये हिस्सा मिळणारे मोहिनी मोहन दत्ता कोण (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

ऑक्टोबरमध्ये  रतन टाटा यांचे निधन झाले आणि संपूर्ण देश हळहळला. त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार कोण याच्याही चर्चा रंगल्या. आता निधन झालेले रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात काही आश्चर्यकारक नावे समोर आली आहेत. टाटा यांनी म्हटले आहे की ते त्यांच्या १,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी एक तृतीयांश म्हणजेच ५०० कोटी रुपये मोहिनी मोहन दत्ता यांना हस्तांतरित करतील. मोहिनी मोहन ही अशी व्यक्ती आहे जिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे नाव अचानक समोर आल्यानंतर, रतन टाटा यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मोहिनी मोहन दत्ता या टाटा समूहाच्या माजी कर्मचारी आहेत आणि त्यांचे दिवंगत रतन टाटा यांच्याशी जवळचे संबंध होते. टाटा ग्रुपशी संबंधित लोकांसाठी मोहिनी मोहन हे नाव खूपच धक्कादायक आहे.

अचानक नाव आले समोर

रतन टाटा यांच्या मृत्युपत्राच्या आधारे त्यांनी मोठा हिस्सा मिळवण्याचा दावा केला आहे. टाटांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्यांनी ज्या अपेक्षा केल्या होत्या त्यापेक्षा त्याची मागणी खूपच वेगळी आहे. रतन टाटा यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून मोहिनी मोहन दत्ता आणि इतरांमध्ये काही मतभेद असल्याच्या बातम्या आहेत. 

Economic Times मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जेव्हा मोहिनी मोहन दत्ता यांच्याशी याबद्दल संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मृत्युपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्या, टाटांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जेजेभॉय यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मेहली मिस्त्री यांनी सांगितले की, ‘मला या व्यक्तीबद्दल कोणतीही टिप्पणी करायची नाही.’ पण या सगळ्यामध्ये, प्रश्न असा आहे की मोहिनी मोहन दत्ता कोण आहे?

Ratan Tata: रतन टाटांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, उत्तराधिकारी, एकूण संपत्ती नेमकी किती?

कोण आहे मोहिनी मोहन दत्ता?

जमशेदपूर येथील रहिवासी मोहिनी मोहन दत्ता ट्रॅव्हल क्षेत्रात काम करतात. त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम मिळणे हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. दत्ता यांचे कुटुंब ‘स्टॅलियन’ नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते, जी २०१३ मध्ये ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाली. ताज सर्व्हिसेस ही ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग आहे. 

स्टॅलियनमध्ये दत्ता कुटुंबाचा ८०% हिस्सा होता, तर उर्वरित २०% हिस्सा टाटा इंडस्ट्रीजचा होता. मोहिनी दत्ता या टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिल्या आहेत, जी थॉमस कुकशी संबंधित कंपनी होती. दत्ताच्या दोन मुलींपैकी एकीने २०२४ पर्यंत नऊ वर्षे टाटा ट्रस्टमध्ये काम केले. त्यापूर्वी ती ताज हॉटेल्समध्ये काम करायची.

काय आहे सूत्रांचा दावा 

टाटा समूहाच्या सूत्रांचा दावा आहे की दत्ता स्वतःला टाटा कुटुंबाच्या जवळचे म्हणवून घ्यायचे. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान, दत्ता यांनी माध्यमांना सांगितले की ते जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये रतन टाटा यांना पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी रतन टाटा फक्त २४ वर्षांचे होते. त्यांच्या मते टाटांनी मला मदत केली आणि आयुष्यात पुढे नेले. त्यांनी दावा केला की ते गेल्या 60 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईतील एनसीपीए येथे आयोजित रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त मोहिनी दत्ता यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

रतन टाटा यांच्याकडे होत्या ‘या’ 5 सर्वात महागड्या वस्तू, ज्यांची किंमत होती तब्बल…

कायद्यानुसार होणार वाटणी

रतन टाटा यांची बहुतेक संपत्ती धर्मादाय कार्यासाठी समर्पित आहे. लाभार्थी बनवण्यात आलेल्या त्याच्या सावत्र बहिणींनीही धर्मादाय संस्थेतील त्यांचा वाटा परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या खुलाशानंतर, कायदेशीर तज्ज्ञांना मालमत्तेच्या विभाजनाची चौकशी होण्याची अपेक्षा आहे. टाटांच्या सावत्र बहिणींनाही त्यांचा वाटा दान करायचा आहे. 

आता या बातम्या समोर आल्यानंतर टाटा समूहात बरीच चर्चा सुरू आहे. कायदेशीर तज्ज्ञ मालमत्तेचे विभाजन कसे करायचे यावर लक्ष केंद्रित करत आहेत. आयुष्याच्या शेवटच्या काळात, त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग दान करण्यासाठी रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या दोन संस्था स्थापन केल्या.

Web Title: Who is mohini mohan dutta ratan tata mentioned name in beneficiaries may receive one third of his residual estate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Business News
  • Ratan Tata

संबंधित बातम्या

EPFO ची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता ८.८ लाखांऐवजी मिळतील १५ लाख रुपये; जाणून घ्या
1

EPFO ची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, आता ८.८ लाखांऐवजी मिळतील १५ लाख रुपये; जाणून घ्या

‘या’ कारणांमुळे कोसळला शेअर बाजार, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
2

‘या’ कारणांमुळे कोसळला शेअर बाजार, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

शेअरची किंमत ८० रुपये, GMP आता ४० रुपयांवर, पुढील आठवड्यात सुरू होत आहे ‘या’ कंपनीचा IPO
3

शेअरची किंमत ८० रुपये, GMP आता ४० रुपयांवर, पुढील आठवड्यात सुरू होत आहे ‘या’ कंपनीचा IPO

शेअर बाजारात सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स ६९३ अंकांनी घसरला, ‘ही’ आहेत घसरणीचे ३ कारणे
4

शेअर बाजारात सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स ६९३ अंकांनी घसरला, ‘ही’ आहेत घसरणीचे ३ कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.