का कोसळलं हिंडेनबर्गचं साम्राज्य? अदानींवरील आरोपांचं काय होणार? वाचा A टू Z माहिती
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गने आपलं कामकाज अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच हिंडनबर्गने 2023 मध्ये भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर गंभीर आरोप केले होते. ज्यात गौतम अदानींचं जवळपास १०० अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं. अंदानींविरोधात फसवणुकीसह इतर आरोप केले होते. त्यामुळे शेअर बाजारात एक वर्ष गौतम अदानी यांच्या समूहाला मोठा फटका सहन करावा लागला होता. भारतात विरोधकांकडू हिंडनबर्गच्या या आरोपांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच संस्थापक एंडरसन यांनी ही रिसर्च फर्म अचानक बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. जगभरातील अनेक मोठी प्रकरणं बाहेर काढणाऱ्या हिंडेनबर्गचं साम्राज्य अचानक का कोसळलं? अदानी ग्रुपवरील आरोपांचं आता पुढे काय होणार? या सर्व प्रश्नाची उत्तर जाणून घेऊयात, या रिपोर्टमधून…
संस्थापक अँडरसन यांनी दिलं स्पष्टीकरण
हिंडेनबर्गचे संस्थापक अँडरसन यांनी एका वैयक्तिक पत्रात फर्म बंद करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. हिंडेनबर्गने आपले लक्ष्य पूर्ण केलं आहे. त्यामुळे फर्म बंद करण्याची योजना बऱ्याच काळापासून सुरू होती, ज्यामध्ये आम्हाला एका पोंझी योजनेची चौकशी पूर्ण करायची होती. जेव्हा हिंडेनबर्गची स्थापना करण्यात आली. त्यावेळी संसाधने आणि पैसा दोन्हीची कमतरता होती, परंतु कालांतराने हिंडेनबर्गला सर्व अडचणींचा सामना करावा लागला. तीन खटले दाखल झाले होते, ज्यामुळे त्याच्याकडे असलेले सर्व पैसे खर्च झाले होते. अशा वेळी, वकील ब्रायन वूड यांनी त्यांना खूप मदत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
वादग्रस्त शॉर्ट सेलिंगसह वादग्रस्त आणि आक्रमकपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीच्या अचानक बंदमुळे होण्यामुळे नैतिकता, कायदेशीरता आणि प्रेरणांस्थानांबद्दल वादविवाद सुरू झाले आहेत. बाजार तज्ज्ञ आणि माजी वरिष्ठ बँकर अजय बग्गा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मत व्यक्त केलं असून हिंडेनबर्गचे व्यवसाय मॉडेल “ग्रे झोन” मध्ये कार्यरत असल्याचं म्हटलं आहे. ही फर्म अनेकदा कंपन्यांबद्दल नुकसानदायक अहवाल प्रकाशित करत असे आणि त्याच वेळी त्यांच्याविरुद्ध शॉर्ट पोझिशन्स घेत असे. हे उपक्रम वारंवार हेज फंडांच्या भागीदारीत केले जात होते आणि मार्केट पोझिशन्स उघड केली जात नव्हती. त्यामुळे पारदर्शकतेची चिंता निर्माण होते आणि मार्केट मॅनिपुलेशनचे आरोप होत होते.
“शॉर्ट सेलर्स कधीच शाश्वत नफा कमवत नाहीत. म्हणूनच २००८ मध्ये काही मोजक्याच लोकांना याचा फायदा झाला होता. उर्वरित लोक दीर्घकाळात फारसा परतावा देत नाहीत. अशा मॉडेलची आर्थिक अव्यवहार्यता हिंडेनबर्गच्या पतनास कारणीभूत ठरू शकते, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कायदेशीर तपासणी किंवा दंडाच्या धमकीमुळे हिंडेनबर्गने आपलं काम बंद केलं असावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने कंपन्यांवर नुकसानकारक अहवाल प्रकाशित करण्यासाठी बरेच लक्ष वेधलं, ज्यामुळे त्यांचं बाजार मूल्य आणि प्रतिष्ठा अनेकदा खराब होतं. या फर्मने स्वतःला सत्य शोधणारा वॉचडॉग म्हणून मार्केट केले, तर टीकाकारांनी त्यावर नैतिक विचारांपेक्षा नफ्याला प्राधान्य देणारी आर्थिकदृष्ट्या प्रेरित संस्था असल्याचा आरोप केला. हिंडेनबर्ग रिसर्च बंद केल्याने शॉर्ट सेलिंगच्या नैतिक आणि नियामक सीमांवर चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.