Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एलॉन मस्क US निवडणूक प्रचारात व्यस्त; X वर मात्र कर्मचारी कपातीची टांगती तलवार

एलॉन मस्क अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करत आहेत. अशातच त्यांनी एक्सच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे समोर आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 03, 2024 | 06:53 PM
एकिकडे मस्क यांचा अमेरिकी निवडणुकीसाठी प्रचार, दुसरीकडे एक्स कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार!

एकिकडे मस्क यांचा अमेरिकी निवडणुकीसाठी प्रचार, दुसरीकडे एक्स कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार!

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानी कायम आहे. मात्र, असे असले तरी त्यांच्या कंपन्यांमधील टाळेबंदीबाबत नेहमीच माहिती समोर येत असते. एक्स या समाजमाध्यमावर नेहमीच यातील बरीच माहिती समोर येत असते. अलीकडेच, एलॉन मस्क यांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.

टाळेबंदीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सच्या अंतर्गत स्त्रोतांचा आणि कार्यस्थळावरील प्लॅटफॉर्म ब्लाइंडवरील पोस्टचा हवाला देऊन असे सांगण्यात आले आहे की, एक्सच्या अभियांत्रिकी विभागातून कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. अहवालानुसार टाळेबंदीच्या दोन महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांना कंपनीतील त्यांच्या योगदानाचा एक पृष्ठाचा सारांश त्यांच्या नेत्यांना सादर करण्यास सांगितले होते.

हे देखील वाचा – रेशन कार्डवरील धान्य वाटपासंदर्भात मोठा बदल; 1 नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू! वाचा… सविस्तर!

द व्हर्जने अहवाल दिला आहे की, याचा अर्थ असा की त्यांचा स्टॉक प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीतील त्यांच्या योगदानाबद्दल एक पृष्ठाचा सारांश सादर करावा लागला. ज्या कर्मचाऱ्यांनी तसे केले किंवा न केले त्यांच्यावर आता कर्मचारी कपातीची टांगती तलवार आली आहे. या छाटणी प्रक्रियेत किती कर्मचारी बाधित झाले आहेत. याबाबत कोणतीही माहिती नाही.

एलॉन मस्क आणि एक्स यांनी अद्याप या टाळेबंदीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एलॉन मस्क अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करत आहेत. मस्क यांनी अलीकडेच एक्स कर्मचाऱ्यांना त्याच्या स्टॉक ग्रँट्सबाबत एक ई-मेल पाठवला होता.

1000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश

या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये देखील, एक्सने आपल्या ‘सुरक्षा’ कर्मचाऱ्यांपैकी 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. तर मस्क यांनी 2022 मध्ये एक्स विकत घेतानाच कंपनीतील सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. अर्थात एकाच वेळी कंपनीतील 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. या कर्मचारी कपातीमुळे विविधीकरण, समावेश, उत्पादन विकास आणि डिझाइन यासारख्या कंपनीच्या अनेक विभागांवर परिणाम झाला. कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन टीममधील कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले होते.

Web Title: X layoffs musk campaign for the american election on the other hand x layoffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • elon musk

संबंधित बातम्या

बापरे…एकाच दिवसात 45 अब्ज डॉलर कमावले; Elon Musk ची जगातील पहिला ‘ट्रिलियनेअर’ बनण्याच्या दिशेने वाटचाल, आणखी संपत्ती…
1

बापरे…एकाच दिवसात 45 अब्ज डॉलर कमावले; Elon Musk ची जगातील पहिला ‘ट्रिलियनेअर’ बनण्याच्या दिशेने वाटचाल, आणखी संपत्ती…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.