Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही चुकीचा आयटीआर भरलाय का? आयकर विभाग पाठवतंय नोटीस… हलक्यात घेऊ नका!

आयकर विभाग चुकीच्या पद्धतीने रिटर्न भरणाऱ्यांना नोटीस पाठवत आहे. असे अनेक करदाते आहेत, ज्यांनी आयटीआर भरताना चुकीचा फॉर्म निवडला होता. तुमच्याकडूनही आयटीआर भरताना चूक झाली असेल तर तुम्हालाही अशी नोटीस मिळाली असेल. त्यामुळे अशा परीस्थितीत काय कराल? हे आज आपण समजून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 13, 2024 | 09:28 PM
तुम्हीही चुकीचा आयटीआर भरलाय का? आयकर विभाग पाठवतंय नोटीस... हलक्यात घेऊ नका!

तुम्हीही चुकीचा आयटीआर भरलाय का? आयकर विभाग पाठवतंय नोटीस... हलक्यात घेऊ नका!

Follow Us
Close
Follow Us:

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरल्यानंतर, करदाते सध्या रिफंडची वाट पाहत आहेत. ज्यांचा टीडीएस कंपनीने कापला आहे. तर दुसरीकडे, ज्यांनी आयटीआर भरताना काही चूक केली आहे, अशा लोकांना आयकर विभागाकडून नोटिसा मिळू लागल्या आहेत. यामध्ये चुकीच्या आयटीआर फॉर्मची निवड देखील समाविष्ट आहे. रिटर्न भरताना तुम्ही चुकीचा फॉर्म निवडला असेल, तर तुम्हालाही कदाचित नोटीसही मिळाली असेल. आयकर विभाग ही नोटीस नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवत आहे.

काय म्हटलंय आयकर विभागाने मेलमध्ये?

आयकर विभागाने ई-मेलवर पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, रिटर्न भरताना तुम्ही निवडलेला फॉर्म चुकीचा आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला चूक दुरुस्त करून, पुन्हा आयटीआर भरावा लागणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क किंवा दंड भरावा लागणार नाही. तुम्ही योग्य फॉर्म फक्त ऑनलाइन भरू शकतात.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : बाबा रामदेव यांच्यासह ‘हे’ आहे देशातील 5 श्रीमंत आध्यात्मिक गुरु; वाचा… त्यांची संपत्ती?

काय चूक झाली, सर्व समजणार

तुम्ही कोणताही आयटीआर फॉर्म निवडला असला, तरी तो का चुकीचा होता? याची संपूर्ण माहिती इन्कम टॅक्सकडून आलेल्या मेलमध्ये देण्यात आली आहे. वास्तविक, फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS मध्ये उत्पन्नाच्या स्त्रोताशी संबंधित संपूर्ण माहिती असते. अशा परिस्थितीत अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत लोक चुकीचा फॉर्म निवडतात. त्यावेळी योग्य रिटर्न भरला जातो. पण नंतर आयकर विभागाकडून फॉर्मची छाननी केली असता, चुकीचा आयटीआर फॉर्म निवडल्याचे आढळून येते.

टेन्शन घेऊ नका

चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यानंतर मिळालेल्या नोटीसबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. नोटीसमध्ये तुम्ही कोणती चूक केली आहे आणि तुम्ही ती कशी दुरुस्त करू शकता हे स्पष्टपणे नमूद केले आहे. ही चूक सुधारण्याची शेवटची तारीखही ई-मेलमध्ये दिली आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही निर्धारित तारखेपर्यंत ही चूक सुधारली नाही तर तुमचे रिटर्न अवैध मानले जाईल. यानंतर तुम्हाला दंडासह रिटर्न भरावा लागणार आहे.

हेही वाचा : भारतीय कंपन्यांचा जगभरात डंका; जेएसडब्ल्यूने खरेदी केली ऑस्ट्रेलियाची ‘ही’ कंपनी!

31 डिसेंबरपर्यंत भरता येणार दंडासह आयटीआर

तुम्ही अजून तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत उशीरा आयटीआर दाखल करू शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. हा दंड तुमचे उत्पन्न किती आहे? यावर अवलंबून असेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे. त्यांना 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

Web Title: You also filled the wrong itr form taking income tax notice lightly may prove costly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 09:23 PM

Topics:  

  • Income Tax Return

संबंधित बातम्या

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर
1

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग
2

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

तुम्ही ITR भरला का? शेवटचे 7 दिवस बाकी, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
3

तुम्ही ITR भरला का? शेवटचे 7 दिवस बाकी, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

Income Tax Filing: मोठी बातमी! ITR – 5 Excel फॉर्म झाला Live; कोणत्या करदात्यांसाठी गरजेचा, घ्या जाणून
4

Income Tax Filing: मोठी बातमी! ITR – 5 Excel फॉर्म झाला Live; कोणत्या करदात्यांसाठी गरजेचा, घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.