बिझनेस सुरु करायचाय? सुरु करा 'हे' युनिट; दर महिन्याला होईल बक्कळ कमाई!
सध्याच्या घडीला अनेक जण आपली नोकरी सोडून, छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर, यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. अशातच आता तुम्हालाही बिझनेस सुरु करायचा आहे. पण कळत नाहीये नेमका कोणता बिझनेस सुरु करायचा? तुमचीही बिझनेस करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये प्रोडक्टची कायम मागणी असते.
कसे आहे व्यवसायाचे स्वरुप
आम्ही साबण मॅन्युफॅक्चरिंग यूनिटबद्दल बोलत आहोत. या व्यवसायात मशिनच्या मदतीने साबण बनवण्यात येतात. यानंतर बाजारात नेले जातात. मात्र, अनेकजण हाताने साबण बनवून बाजारात विकतात. चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणातही सुरू करता येतो.
साबणाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. अगदी लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत, गावांमध्ये सर्व घरात साबणाचा वापर आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मुळात म्हणजे तुम्ही अगदी कमी पैशात साबणाचे मॅन्युफॅक्चरिंग यूनिट उघडू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकतात. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत.
या बिझनेससाठी तुम्हाला मिळेल कर्ज
साबणाचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. यामध्ये युनिटची जागा, यंत्रसामग्री, भांडवल यांचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागणार आहे. उर्वरित रक्कम तुम्ही केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकतात.
साबण बनवण्याचे युनिट सेट करण्यासाठी तुम्हाला एकूण 750 चौरस फूट लागणार आहे. यामध्ये 500 चौरस फूट जागा बंद ठेवा आणि उर्वरित जागा ओपन ठेवा. यासाठी सर्व प्रकारच्या मशिन्ससह 8 प्रकारची उपकरणे लागणार आहेत. प्रकल्प अहवालानुसार, ही यंत्र बसवण्यासाठी एकूण खर्च एका लाखापर्यंत येऊ शकतो.
साबणाच्या बिझनेसमुळे किती होऊ शकते कमाई?
केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रकल्प प्रोफाइलनुसार, तुम्ही 1 वर्षात एकूण 4 लाख किलो उत्पादन करू शकणार आहात. त्याची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये असेल. व्यवसायातील सर्व खर्च पाहिल्यानंतर तुम्हाला दरमहा 6 लाख रुपये म्हणजेच 50,000 रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.