81 रुपयांवर आला अदानींचा हा शेअर; पडत्या बाजारात गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री!
अदानी उद्योगसमुहाकडे अनेक सिमेंट कंपन्या आहेत. ज्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे संघी इंडस्ट्रीज होय. या कंपनीच्या शेअर्सवर गेल्या काही काळापासून खूप दबाव असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी गुरुवारी हा शेअर बाजारातील विक्रीदरम्यान 2.29 टक्क्यांनी घसरून 81.01 रुपयांवर बंद झाला आहे.
52 आठवड्यांचा निच्चांकी पातळीवर
शुक्रवारी (ता.१६) शेअर बाजाराला गुरूनानक जयंती निमित्ती सुट्टी होती. शेअरच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाबद्दल बोलायचे तर तो 156.20 रुपये आहे. जानेवारी 2024 मध्ये ही शेअरची किंमत होती. ऑक्टोबर 2024 मध्ये शेअरची किंमत 71.66 रुपयांपर्यंत खाली आली होती. हा शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी पातळीवर आहे.
कंपनीचे तिमाही निकाल कसे?
सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडला सप्टेंबर तिमाहीत 196 रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 38.8 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. सिमेंट निर्मात्याने सांगितले की, सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत महसूल 152 कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 181 कोटी होता. सांघी इंडस्ट्रीज अंबुजा सिमेंट्स लिमिटेडची उपकंपनी आहे.
सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण
गेल्या काही वर्षांत अदानी समूहाने एकापाठोपाठ अनेक सिमेंट कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. या वर्षी जूनमध्ये कंपनीने हैदराबादस्थित पेन्ना सिमेंट 10,422 कोटी रुपयांना आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सौराष्ट्रस्थित संघी इंडस्ट्रीज लिमिटेड 5,185 कोटी रुपयांना खरेदी केली होती. अलीकडेच अदानी समूहाने सीके बिर्ला समूहाची कंपनी ओरिएंट सिमेंट लिमिटेडला 8,100 कोटी रुपयांच्या व्यवहारात विकत घेण्याचे मान्य केले आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीची क्षमता 85 लाख टनांनी वाढणार असून अंबुजाची कार्य क्षमता 9.74 कोटी टन होईल.
अदानी समूहाची योजना
2028 पर्यंत हे प्रतिवर्ष 140 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची अदानी समूहाची योजना आहे, जी मार्केट लीडर अल्ट्राटेकच्या सध्याच्या 149.5 दशलक्ष टन क्षमतेपेक्षा थोडी कमी आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)