शेअर बाजाराची पडझड, मात्र... हा स्टॉक करतोय दमदार कामगिरी, भविष्यात देणार जबरदस्त रिटर्न्स!
गेले दोन दिवस शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना, सेन्सेक्सने तब्बल १,०१७.२३ अंकांची गटागंळी नोंदवली आहे. एकिकडे शेअर बाजाराची उतरण, सुरु असतानाच झोमॅटोच्या शेअरने मात्र, आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. आज शेअर बाजार मोठी घसरण झालेली असताना देखील झोमॅटोचा शेअर 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 260 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. त्यामुळे सध्याच्या शेअर बाजारातील पडझडीचा झोमॅटोच्या शेअरवर कोणताही विपरित परिणाम पाहायला मिळत नाहीये.
जेपी मॉर्गनकडून शेअर खरेदीचा सल्ला
अशातच आता ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने झोमॅटोचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. झोमॅटोचा शेअर खरेदी करत असाल तर त्यासाठी टार्गेट प्राईज 208 रुपयांवरून 340 रुपये करावे, असे जेपी मॉर्गनने सुचवले आहे. गुरुवारी झोमॅटो कंपनीचा शेअर 5 सप्टेंबर 2024 रोजी 4.94 टक्क्यांनी वाढून 254.85 रुपयांवर स्थिरावला होता. त्यानंतर आज बाजाराची पडझड झालेली असताना देखील झोमॅटोच्या शेअरने 260 रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – व्होडाफोन आयडियाच्या शेअरची 14 टक्क्यांपर्यंत घसरण; वाचा… नेमकी का झालीये घसरण!
सीएलएसएने दिले झोमॅटो शेअरचे 353 रुपयांचे टार्गेट
जेपी मॉर्गनने झोमॅटो हा शेअर ओव्हरवेट या कॅटेगिरीत टाकला असून, डिसेंबर 2025 पर्यंत या शेअरची टार्गेट प्राईज 340 रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसए याने देखील झोमॅटो शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सीएलएसएने झोमॅटो शेअर खरेदी करताना 353 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 2024 साली गेल्या आठ महिन्यांत या शेअरमध्ये 106 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तीन वर्षांत हा शेअर 160 रुपयांनी तर 2 वर्षांत हा शेअर 327 टक्क्यांनी रिटर्न देऊ शकला आहे. त्यामुळे येत्या काळात हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरणार आहे.
हे देखील वाचा – इन्फोसिसप्रकरणी चौकशी करण्याचे केंद्राचे कर्नाटक सरकारला आदेश; वाचा… काय आहे प्रकरण!
भविष्यात झोमॅटोचा शेअर पैशांचा पाऊस पाडणार
झोमॅटोच्या शेअरची किंमत शुक्रवारी 2.1 टक्क्यांनी वाढली. तर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअर्सनी संमिश्र कामगिरी केली आहे. विप्रो आणि फर्स्टसोर्स सोल्युशन्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स खाली जात आहे. तर इन्फो एज इंडिया आणि अॅकलार्क्स सर्व्हिसेसचा शेअर वरती जात आहेत. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल आहेत. त्यामुळे आता भविष्यात झोमॅटोचा शेअर पैशांचा पाऊस पाडणार असून, गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स मिळणार आहे. याबाबत सध्या झोमॅटो या शेअरची चांगलीच चर्चा होत आहे. आगामी काळात हा शेअर तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो, असा अंदाज वरती सांगितल्याप्रमाणे ब्रोकरेज हाऊसेस व्यक्त करत आहेत.