Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung कडून विद्यार्थ्यांना फ्युचर टेक स्किलचे प्रशिक्षण ! देशभरातील 3500 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसकडून 2024 मध्ये 3500 विद्यार्थ्यांना फ्यूचर-टेक स्किल्‍समध्‍ये प्रशिक्षित केले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एआय, आयओटी, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंगमध्‍ये प्रशिक्षण देण्यात येते.

  • By नारायण परब
Updated On: Nov 11, 2024 | 05:32 PM
Samsung कडून विद्यार्थ्यांना फ्युचर टेक स्किलचे प्रशिक्षण ! देशभरातील 3500 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग इंडियाने वर्ष २०२४ साठी सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस (एसआयसी) प्रोग्राम अंतर्गत ३,५०० विद्यार्थ्‍यांचे सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.भारत सरकारच्‍या #SkillIndia आणि #DigitalIndia उपक्रमांशी संलग्‍न राहत सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस तरूणांना एआय, इंटरनेट ऑफ थिंग्‍ज, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग अशा उच्‍च मागणी असलेल्‍या टेक क्षेत्रांमध्‍ये प्रशिक्षण देत त्‍यांची रोजगारक्षमता सुधारण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस २०२२ मध्‍ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) सोबत सहयोगाने भारतात लाँच करण्‍यात आला.

२०२४ मध्‍ये, सॅमसंगच्‍या प्रमुख सीएसआर उपक्रमाने २०२३ मधील ३,००० वि़द्यार्थ्‍यांच्‍या तुलनेत ३,५०० विद्यार्थ्‍यांची नोंदणी झाली.  या उपक्रमांतर्गत उत्तर प्रदेश, दिल्‍ली एनसीआर, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये १२ एसआयसी सर्टिफिकेशन इव्‍हेण्‍ट्स आयोजित करण्‍यात आले. एसआयसी अंतर्गत कोर्सेस सहा युनिव्‍हर्सिटीजमध्‍ये, तसेच एका नॅशनल स्किलिंग इन्स्टिट्यूटमध्‍ये सुरू आहेत.

”एआय नवीन तंत्रज्ञानांच्‍या युगात प्रवेश करत आपल्‍या जीवनामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज असताना आजच्‍या तरूणांशी संलग्‍न होणे आणि त्‍यांच्‍या क्षमतांचा उपयोग करून उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवणे आवश्‍यक आहे. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पससह आमची भारतीय तरूणांमधील कौशल्‍यांसंदर्भातील तफावत दूर करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे, ज्‍यामुळे ते भावी इनोव्‍हेटर्स बनू शकतात. हा प्रोग्राम भारताची विकासगाथा, स्किल इंडिया आणि डिजिटल इंडियाप्रती प्रबळ सहयोगी व योगदानकर्ता असण्‍याप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्‍हणाले.

सॅमसंगच्‍या सर्वोत्तमतेप्रती सातत्‍यपूर्ण प्रेरणेचा भाग म्‍हणून या शैक्षणिक संस्‍थांमधील प्रत्‍येक डोमनमधील टॉपर्सना १ लाख रूपयांची रोख बक्षीसे व सॅमसंग उत्‍पादनांसह सन्‍मानित करण्‍यात येईल. निवडक राष्‍ट्रीय टॉपर्सना कंपनीच्‍या लीडरशीपशी संलग्‍न होण्‍यासाठी दिल्‍ली एनसीआरमधील सॅमसंगच्‍या अत्‍याधुनिक केंद्रांना भेट देण्‍याची संधी मिळेल.

”एकूण, कोर्सने एआय प्रकल्‍पांसाठी माझ्या सुसज्‍जतेमध्ये वाढ केली आणि क्षेत्रातील उत्‍साहवर्धक संधींसाठी दरवाजे खुले केले. आवश्‍यक एआय संकल्‍पनांसह अभ्‍यासक्रमाची सुरूवात झाली आणि मशिन लर्निंग व सखोल अध्‍ययन उपयोजनांकडे वाटचाल झाली. या प्रगतीमधून मला प्रबळ सैद्धांतिक पाया घडवण्‍याची सुविधा मिळाली, ज्‍यानंतर मला गुंतागूंतींच्‍या विषयांकडे आत्‍मविश्‍वासासह वळता आले,” असे नुकतेच एआय कोर्स पूर्ण केलेली कांचन लता श्रीवास्‍तव म्‍हणाली.

यंदा, एआय प्रोग्राममधील सहभागींनी २७० तास सैद्धांतिक प्रशिक्षण घेतले, ज्‍यानंतर ८० तास प्रकल्‍प कार्य पूर्ण केले. आयओटी व बिग डेटा विद्यार्थ्‍यांनी १६० तास सिद्धांत आणि ८० तास प्रत्‍यक्ष प्रकल्‍प कार्य केले, तर कोडिंग अँड प्रोग्रामिंग सहभागींनी ८० तास सिद्धांत पूर्ण केल्‍यानंतर हॅकेथॉनमध्‍ये सहभाग घेतला. व्‍यावहारिक अध्‍ययन मॉड्यूल्‍स, कॅपस्‍टोन प्रकल्‍प आणि सर्वोत्तम प्रशिक्षणासह विद्यार्थ्‍यांना उदयोन्‍मुख टेक क्षेत्रांमधील प्रत्‍यक्ष अनुभव मिळाला.

”इंटरनेट ऑफ थिंग्‍ज (आयओटी) प्रशिक्षक म्‍हणून मला विद्यार्थ्‍यांना आज तंत्रज्ञानामधील सर्वात उत्‍साहवर्धक क्षेत्राबाबत मार्गदर्शन करण्‍याचे भाग्‍य मिळाले. कोर्सची संरचना विद्यार्थ्‍यांना सिद्धांतासह सराव करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे आयओटीच्‍या क्षमतेबाबत आकलन होत कनेक्‍टीव्‍हीटी व नाविन्‍यतेला गती मिळते. विद्यार्थ्‍यांना आजच्‍या युगामधील आयओटीच्‍या महत्त्वाला व्‍यापून घेण्‍यासह वास्‍तविक जीवनातील स्थितींसाठी त्‍यांच्‍या कौशल्‍यांचा वापर करताना पाहून खूप आनंद झाला आहे. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस विद्यार्थ्‍यांना एक्‍स्‍प्‍लोअर व इनोव्‍हेट करण्‍यास संपन्‍न वातावरण देतो,” असे नॅशनल स्‍मॉल इंडस्‍ट्रीज कॉर्पोरेशन (एनएसआयसी), नवी दिल्ली येथील आयओटी ट्रेनर अमन खान म्हणाले. एनएसआयसी येथे २८ ऑक्‍टोबर रोजी आयओटीमधील २०० विद्यार्थ्‍यांच्‍या सर्टिफिकेशन इव्‍हेण्‍टसह २०२४ प्रोग्रामच्‍या अंतिम टप्‍प्‍याची सांगता झाली.

सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आणि सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सॅमसंगच्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीप्रती विद्यमान कटिबद्धतेमधून भारतातील फ्यूचर-टेक प्रमुखांना निपुण व प्रशिक्षित करण्‍याप्रती त्‍यांचे मिशन दिसून येते. या प्रोग्राम्‍सच्‍या माध्‍यमातून सॅमसंग भारतातील तरूणांना पाठिंबा देत आहे, तसेच त्‍यांना कौशल्‍यांसह सुसज्‍ज करत आहे, जी त्‍यांच्‍या वैयक्तिक व व्‍यावसायिक विकासाला प्रगत करण्‍यासोबत भारताला जागतिक तंत्रज्ञान हब म्‍हणून देखील सक्षम करतात.

Web Title: 3500 students of the country were given training in future tech skills by samsung

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 05:32 PM

Topics:  

  • Skill Training

संबंधित बातम्या

मनोरुग्णांचा आत्मविश्वास वाढवणारी “स्किल इंडिया”ची संजीवनी!
1

मनोरुग्णांचा आत्मविश्वास वाढवणारी “स्किल इंडिया”ची संजीवनी!

‘या’ कौशल्यांचा आधारे कमवा पैसे; होईल कौतुकाचा वर्षाव, मिळेल यश
2

‘या’ कौशल्यांचा आधारे कमवा पैसे; होईल कौतुकाचा वर्षाव, मिळेल यश

कामाच्या ठिकाणी तुमच्यात कोणते स्किल्स असणे महत्वाचे? LinkedIn कडून ‘स्किल्‍स ऑन द राइज 2025’ ची लिस्ट जाहीर
3

कामाच्या ठिकाणी तुमच्यात कोणते स्किल्स असणे महत्वाचे? LinkedIn कडून ‘स्किल्‍स ऑन द राइज 2025’ ची लिस्ट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.