जगात अशक्य असे काहीच नाही याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहेत ओडिशाचे जय किशोर प्रधान. प्रधान यांनी वयाच्या 64 व्या वर्षी देशात मेडिकल प्रवेशासाठी असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) पात्र करत एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या चिकाटीची आणि समपर्णाचे कौतुक केले जात आहे. त्यांनी पुन्हा एकदा सिध्द केले की, शिक्षणाला वयाची अट नसते.
जय किशोर प्रधान हे भारतीय स्टेट बॅंकेतून (SBI) मधून डेप्युटी मॅनेजर पदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यांचे लहानपणापासून डॉक्टर बनायचे होते. मात्र हे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि मेडिकल साठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेची तयारी सुरु केली. आपले ध्येय निश्चित केले.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रधान यांनी एका ऑनलाइन कोचिंग प्रोग्राममध्ये नावनोंदणी केली, ज्याद्वारे त्यांनी एका आदर्शवत विद्यार्थ्याप्रमाणे चिकाटीने अभ्यास केला. जीवनाच्या या टप्प्यावर कुटुंब साभाळत त्यांनी आपल्या ध्येयासाठी समर्पण वृत्ती दाखविली आणि त्यामध्ये यश मिळवून दाखविले. ज्यावयात सामान्यत: आराम करण्याचा विचार केला जातो. त्या वयात त्यांनी स्वप्नाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने वाटचालही सुरु केली आहे.
इंटरमिजिएटचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्याकाळी मेडिकलची पात्रता परीक्षा दिली होती मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नव्हते. मात्र त्यांना त्यांच्या जुळ्या मुलींकडून प्रेरणा मिळाली ज्यावेळी त्या नीटच्या परीक्षेसाठी तयारी करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरु करण्याचे ठरविले.तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नीटसंबंधी 2019 मध्ये वयोमर्यादा उठवण्याचा निर्णय हा प्रधान यांच्या साठी महत्वाचा ठरला.
प्रधान यांनी नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्यांनी वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (VIMSAR) मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांचा डॉक्टर बनण्याचा हा आदर्शवत प्रवास सुरु झाला असून लवकरच ते त्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. प्रधान यांनी नीट परीक्षा पात्र करत नीटसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरले आहेतच शिवाय, चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग कोणत्याही वयात करु शकता हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासामुळे ते देशवासियांसाठी एक रोल मॉडेल ठरले आहेत.