फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला आयोजित करण्यात आले आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये विविध पदांचा विचार केला जाणार आहे. मुळात, या भरतीसाठी रिक्त ७५ जागांचा विउचार केला जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NTRO च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या भरतीच्या संदर्भांत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेत या भरतीसंदर्भात अधिक सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. सायंटिस्ट बीच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : UIIC AO भरतीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात; २०० रिक्त जागांसाठी व्हॅकन्सी उपल्बध
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातील ३५ पदे, कॉम्प्युटर सायन्स विभागातील ३० पदे, जियो-इन्फॉर्मेटक्स एवं रिमोट सेंसिंग विभागातील ५ पदे तर मॅथेमॅटिक्स विभागातील ५ पदांचा विचार या भरतीच्या प्रक्रियेत केला जाणार आहे. मुळात, या पदांसाठी उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. नियुक्तीचा कारोभार सुरु करण्यात आला आहे. राज करण्यासाठी उमेदवारांना काही आतील शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत.
तसेच या अटी शर्ती शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अधिसूचनेमध्ये उमेदवारांच्या वयासाठी नमूद असलेल्या वयोमर्यादेच्या अटीनुसार, जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर नियमानुसार, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार येईल.
हे देखील वाचा : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शाळेत ७५ टक्के हजेरी अनिवार्य; अन्यथा ‘ही’ होणार कारवाई
अधिसूचनेत नमूद शैक्षणिक अटीनुसार, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयामध्ये पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित विषयामध्ये गेटचा स्कोर कार्ड असणे आवश्यक आहे. NTRO च्या या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही रक्कमेची भरपाई करावी लागणार आहे. सामान्य क्ष्रेणी तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २५० अर्जशुल्क भरावे लागणार आहे. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना तसेच अपंग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. GATE स्कोअर, लेखी परीक्षा आणि मुलाखतीत दिलेल्या कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.