फोटो सौजन्य - Social Media
ऍग्रीकल्चर इंश्युरन्स कंपनी (ACI)ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. मॅनेजमेंट पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण ५५ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी aicofindia.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. २९ जानेवारी २०२५ रोजी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज ३० जानेवारी २०२५ पासून करता येणार आहे. तसेच शेवटची तारीख २० फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. मार्च/ एप्रिल २०२५ मध्ये या भरतीच्या संदर्भात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
ACI MT च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. विविध आरक्षित प्रवर्गासाठी ही रक्कम वेगवेगळी आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. OBC तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तर PWD या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनाही सारखीच रक्कम द्यावी लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरायची आहे.
आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आली आहे. किमान २१ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद काही शैक्षणिक अटी शर्तींनुसार, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात डिग्री असणे आवश्यक आहे.
या भरतीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना चार टप्पे पार करावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षेचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्पयात उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या चारही चारी टप्प्यांना उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी aicofindia.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.