अहमदनगर महापालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर पदासाठी भरती; मिळणार 50,000 रुपये पगार
अहमदनगर महापालिकेत आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभागात भरती निघाली आहे. व्हेटर्नरी डॉक्टर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांची व्हेटर्नरी डॉक्टर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना दर महिना ५०,००० रुपये वेतन दिले जाईल. असे महापालिकेने या भरतीबाबत जाहिरातीत म्हटले आहे. त्यामुळे आता आरोग्य क्षेञात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
संस्थेचे नाव : अहमदनगर महापालिका (आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभाग भरती)
भरले जाणारे पद : व्हेटर्नरी डॉक्टर
एकूण रिक्त पद संख्या : १ पद
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२४
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हेही वाचा : ITBP मध्ये 819 जागांसाठी मोठी भरती; ‘ही’ असेल अर्ज करण्याची मुदत, आताच करा अर्ज!
कुठे पाठवाल अर्ज?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
अहमदनगर महापालिकेत रिक्त असलेल्या व्हेटर्नरी डॉक्टर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने BVSc AH पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तत्सव कौन्सिलकडे नोंदणी केलेली असणे देखील आवश्यक आहे.
किती मिळणार पगार?
दर महिना ५०,००० रुपये
कसा कराल अर्ज?
अहमदनगर महापालिकेत आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभागातील भरतीअंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ असणार आहे. असे अहमदनगर महापालिकेच्या आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभागाकडून आपल्या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. व्हेटर्नरी डॉक्टर म्हणून करण्यात येणारी नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीची असेल. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी केली जाईल. असेही महापालिकेने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी अहमदनगर महापालिकेच्या https://amc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.