फोटो सौजन्य- सोशल मीडिया
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद : कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)
एकूण रिक्त पद संख्या : 819 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हेही वाचा : BECIL मध्ये 68 जागांसाठी भरती; मिळणार महिना 35,400 रुपये पगार!
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
– 10वी उत्तीर्ण आणि NSQF स्तर- 1 फूड प्रोडक्शन/किचन कोर्स.
किती मिळणार पगार?
दरमहा 21,700 ते 69,100 रुपये.
कसा कराल अर्ज?
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे. असे इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाकडून आपल्या जाहिरातीत सांगण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा : https://www.speedjob.in/wp-content/uploads/2024/08/ITBP-CONSTABLE-KITCHEN-SERVICE-RECRUITMENT-2024.pdf
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://avnl.co.in/ ला भेट द्या.