फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कॉमन युनिव्हर्सिटी इंटरन्स टेस्ट (CUET) २०२५-२६ संबंधित अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये, या परीक्षे संदर्भात महत्वाची आणि सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी अनके उमेदवार अर्ज करतात आणि उपस्थित राहतात. तसेच यंदाच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. २ जानेवारी २०२५ पासून अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
मुळात, या परीक्षेचे आयोजन १३ मार्च २०२५ पासून करण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंत या परीक्षा सुरु राहतील. महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा संगणक आधारित (CBT) असणार आहेत. या परीक्षे संबंधित सर्व माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर मिळून जाईल. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे, सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना दोन टेस्ट पेपरसाठी अर्ज करण्यास १४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
तर ऍडिशनल टेस्ट पेपर फी रक्कम ७०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना दोन टेस्ट पेपरपर्यंत अर्ज करण्यासाठी १२०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर ६०० रुपये ऍडिशनल टेस्ट पेपर फी लागू असल्यास भरावे लागणार आहे. SC आणि ST साठी दोन टेस्ट पेपरपर्यंत अर्ज करण्यासाठी रक्कम ११०० ठेवण्यात आले आहे. तर ऍडिशनल टेस्ट पेपर फी ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. PWbd प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना दोन टेस्ट पेपरपर्यंत अर्ज करण्यासाठी १००० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तर ऍडिशनल टेस्ट पेपर फी ६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
नियुक्तीसाठी उमेदवारांना काही टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे. यामध्ये परीक्षेचा समावेश आहे. तसेच स्कोअरकार्ड आणि काउन्सिलिंग या टप्प्यांच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. परीक्षा ९० मिनिटांची असणार आहे. या परीक्षेमध्ये एकूण ७५ प्रश्न विचारले जातील. तसेच NTA द्वारे आयोजित ही परीक्षेत उत्तर बरोबर असल्यास ४ गुण दिले जातील. तर अचूक उत्तर असल्यास १ गुण कमी केले जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादेच्या संदर्भात कोणतीही अट लागू करण्यात आली नाही आहे. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे अर्ज करता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.