जर तुम्हाला ट्रेनने मोफत प्रवास करायचा असेल, तर तुम्ही पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर भाक्रा आणि नांगल मार्गावर जाऊ शकता. ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे चालवली जाते आणि मॅनेज केली जाते. या ट्रेनचे नाव भाक्रा-नांगल आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) अप्रेंटिस कायदा, 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम, 1962 अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध ट्रेडमधील एकूण 4232 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 28 डिसेंबर 2024 पासून 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. काही पात्रता निकषांना पात्र करणे अनिवार्य आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून 10वी (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त संबंधित ट्रेडसाठी आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त झालेले असावे. तसेच अधिसूचनेमध्ये उमेदवारांच्या वयोमर्यादेसंबंधित अटी शर्ती नमूद करण्यात आले आहेत. अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे असणे अनिवार्य आहे. तर कमाल वयोमर्यादा 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), आणि दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या 10वी आणि आयटीआय परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येईल. निवड प्रक्रियेनंतर उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल. नियुक्तीच्या या प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना या सर्व टप्प्यांना उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. निवडलेल्या उमेदवारांनी मूळ दस्तऐवजांसह त्याच्या फोटोकॉपी दस्तऐवज पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र (जर लागू असेल), ओळखपत्र, आणि इतर संबंधित कागदपत्रांचा समावेश असेल.
या भरतीमध्ये अर्ज करण्याची सुरुवात 28 डिसेंबर २०२४ रोजी सुरु करण्यात आली आहे. या तारखेपासून अर्ज करण्याची विंडो सुरु करण्यात आली आहे. तर ही विंडो २७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु असणार आहे. इच्छुक उमेदवारांना या तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर (https://scr.indianrailways.gov.in/) जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी आणि कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपद्वारे नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.