फोटो सौजन्य- Official Website
तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) ने मध्ये व्यवस्थापक (स्केल-III), डेप्युटी मॅनेजर (स्केल II) आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. भरती मोहिमेअंतर्गत व्यवस्थापक (स्केल-III) आणि उपव्यवस्थापक (स्केल II) पदांसहित एकूण 19 पदे उपलब्ध आहेत. जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत ते 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करु शकतात. जाणून घेऊया या भरतीप्रक्रियेसंबंधी अधिक माहिती. .
एनएचबी (NHB) भरती 2024 अधिसूचना
NHB च्या वेबसाइटवर तपशीलवार अधिसूचना उपलब्ध आहे. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही थेट PDF डाउनलोड करू शकता.
एनएचबी भर्ती 2024 पीडीएफ
NHB 2024 महत्वाच्या तारखा
या व्यवस्थापकीय पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तुम्ही खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज करु शकता.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 1 नोव्हेंबर 2024
NHB 2024 शैक्षणिक पात्रता निकष
वयो मर्यादा
पदांनुसार या भरतीप्रक्रियेसाठी कमाल आणि किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ज्या पुढीलप्रमाणे आहेत .
व्यवस्थापक (स्केल-III) – 23 ते 35 वर्षे
उपव्यवस्थापक (स्केल – II) – 23 ते 32 वर्षे
NHB व्यवस्थापक 2024 वेतन
व्यवस्थापक स्केल – III – वेतन दरमहा 78230 रुपयांपर्यंत
उपव्यवस्थापक (स्केल – II) – वेतन दरमहा 69810 रुपयांपर्यंत
NHB व्यवस्थापक 2024 साठी अर्ज भरण्यासंबंधी माहिती
या भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करु शकतात. खाली दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यानंतर तुम्ही या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
1:सर्व प्रथम www.nhb.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी
2: वेबसाईटच्या होमपेजवरील NHB भर्ती 2024 लिंकवर क्लिक करा.
3: त्यानंतर तेथे आवश्यक असलेला तपशील प्रदान करा.
4: तपशीलसोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा.
5: अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
अर्जसंबंधी अधिक माहिती करिता अर्जाची पीडीएफ वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेच या लिंकवर क्लिक करुनही ही पीडीएफडाऊनलोड करु शकतात. अर्जासंबंधी पीडीएफसाठी लिंक खाली देण्यात आली आहे.
https://www.nhb.org.in/wp-content/uploads/2024/10/Advertisement-Manager-and-DM-0021012.pdf