फोटो सौजन्य- iStock
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2025 च्या अपंग व्यक्ती (PwD) आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) परीक्षार्थींसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लेखक आणि अतिरिक्त वेळेशी संबंधित अनेक प्रश्न प्राप्त झाल्यानंतर टेस्टिंग एजन्सीने यासंबंधी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
PwD आणि PwBD 1 तास भरपाई वेळ देण्यात येईल
जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अपंग उमेदवारांना (PwD आणि PwBD) तीन तासांच्या JEE Mains 2025 परीक्षेसाठी 1 तास भरपाई वेळ देण्यात येईल . म्हणजे पेपर पूर्ण करण्यासाठी या परीक्षार्थींना एकूण चार तासांचा अवधी लागेल. तसेच या विद्यार्थ्यांनी योग्य प्रमाणपत्रे सादर केल्यावर त्यांना रायटरचा पर्याय उपलब्ध असेल.
NTA ने अधिकृत अधिसूचनेत नमुद केले आहे की, “नॅशनल टेस्टिंग एजन्सी PwD/PwBD उमेदवारांसाठी लेखक आणि भरपाईच्या वेळेशी संबंधित समस्यांबद्दल अनेक चौकशी प्राप्त करत आहे. सरकारी अधिसूचना आणि ऑफिस मेमोरँडम्सच्या संबंधित एक्सट्रेक्ट संदर्भात जेईई मेनसाठी अनुसरण करण्यात येणारी मार्गदर्शक तत्त्वे खाली सूचीबद्ध आहेत,”
परीक्षेचा भरपाई वेळ हा तासाला 20 मिनिटांपेक्षा कमी नसावा
“जा्स्तीचा वेळ किंवा अतिरिक्त वेळ” हा शब्द जो सध्या वापरला जात आहे तो “भरपाई वेळ” मध्ये बदलला पाहिजे. ज्या व्यक्तींना रायटर / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक वापरण्याची परवानगी आहे त्यांच्यासाठी परीक्षेचा भरपाई वेळ हा तासाला 20 मिनिटांपेक्षा कमी नसावा. सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्व PwBD उमेदवारांना 3 तासांच्या तपासणीसाठी किमान एक तासाचा अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो, मग ते सुविधेचा वापर करत असले किंवा नसले तरीही. अतिरिक्त वेळ पाच मिनिटांपेक्षा कमी नसावा आणि पाचच्या पटीत असावा,” NTA जोडले.
जेईई मेन 2025 चे ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार ?
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अजून JEE Mains 2025 चे अधिकृत वेळापत्रक जारी केलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, NTA नोव्हेंबर 2024 च्या अखेरीस ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करु शकते. मात्र या संबंधीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. उमेदवार जेईई मेनसाठी अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.ac.in वर नोंदणी करू शकतात.
जेईई मेन परीक्षेविषयी
जेईई-मेन , पूर्वीची अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा ( एआयईईई ), ही भारतातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी , आर्किटेक्चर आणि नियोजनातील विविध तांत्रिक पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी भारतीय प्रमाणित संगणक-आधारित चाचणी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) आणि यासारख्या प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये बीटेक , बीआर्क , बीप्लॅनिंग इत्यादी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे परीक्षा आयोजित केली जाते.