फोटो सौजन्य - Social Media
Bureau of Indian Standards (BIS) मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली होती. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेच्या आधारे अनेक कुमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज नोंदवले. मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी सहभाग झाले होते. मुळात, या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लवकरच, या भरतीच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या भरतीसाठी तसेच या भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी उमेदवारांना परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे. ग्रुप A , ग्रुप बी तसेच ग्रुप D च्या पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित केली गेली होती.
हे देखील वाचा : कोण म्हणतंय? अभियंतांना जॉब नाही; शेवटची तारीख, आजच करा अर्ज
मुळात, या भरतीच्या संबंधित महत्वाची बातमी आहे कि या परीक्षे संदर्भात प्रवेश पात्र जाहीर करण्यात आले आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र पाहता येणार आहे. तसेच डाउनलोड करता येणार आहे. 345
रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०२४ तसेच २१ नोव्हेंबर २०२४ या तारखेला परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात सखोल माहिती अधिसूचनेत जाहीर आहे. अधिसूचना BSI च्या bis.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
BSI च्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचे होते. अर्ज करताना सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे होते. OBC तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारासांठी ही अर्ज शुल्काची रक्कम ५०० ऋवषयी निश्चित करण्यात आली होती. तर अनुसूचित जाती तसेच अनुसूचित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ होते. तसेच PWD आणि महिला प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही या भरतीसाठी निशुल्क अर्ज करायचे होते.
हे देखील वाचा : IDBI ESO भरती प्रक्रियेविषयी अधिसूचना जाहीर; idbibank.in येथे करता येणार अर्ज
एकूण चार टप्प्यांमध्ये या भरतीची निवड प्रक्रिया आयोजित आहे. लेखी परीक्षा उमेदवारांना पात्र करावे लागणार आहे, यासंदर्भात प्रवेश पात्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षे दरम्यान उमेदवारांनी प्रवेश पात्र सोबत ठेवावे. यानंतर उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी करण्यात येणार आहे. कौशल्य पूर्णपणे पोस्टवर आधारित आहे. यांनतर उमेदवारांची दस्तऐवजांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच वैद्यकीय तपासणीसह निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी या सर्व टप्प्यांमध्ये पात्र होणे अनिवार्य आहे.