फोटो सौजन्य - Social Media
इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI )ने अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये भरती विषयी माहिती पुरवण्यात आली आहे. एकूण १००० पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. Executive- Sales and Operations (ESO) च्या पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या कामामध्ये रस असणाऱ्या तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ७ नोव्हेंबर २०२४ पासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. अर्ज कारण्यागोदर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : AISIL मध्ये ‘या’ पदासाठी व्हॅकन्सी; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
स्त्री असो वा पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI )च्या idbibank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपले आवेदन करू शकतो. तसेच येथेच अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी याच संकेतस्थळाला भेट द्या. नोव्हेंबरच्या ७ तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अगदी काही दिवसांची मुदत अर्ज करण्यासाठी अर्ज कर्त्यांना देण्यात आली आहे. त्या वेळोमर्यादेला ओळखून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करायचे आहे. एकंदरीत, इच्छुक उमेदवारांना १६ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
१ डिसेंबर रोजी या भरती संदर्भात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये अर्ज करता उमेदवार उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच या परीक्षेत पात्र उमेदवाराला निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांमध्ये सहभाग घेता येणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. सामान्य क्ष्रेणी तसेच EWS आणि OBC प्रव्रगातून येणारे उमेदवारांना या भरतीसाठी १०५० रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
हे देखील वाचा : ITBPच्या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज
या भरती संदर्भात काही अटी शर्ती आहेत. ज्यांना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसचे एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. कमीत कमी २० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा, मुलखात, दस्तऐवजांची पडताळणी तससह वैद्यकीय चाचणीच्या आधारावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या सर्व टप्प्यांना पात्र असणे उमेदवारांना बंधनकारक आहे.