फोटो सौजन्य - Social Media
RRB ने नुकतेच जाहीर केलेल्या या भरतीमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही फार महत्वाची भरती ठरू शकते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने ३,४४५ पदांसाठी ही भरती आयोजित केली आहे. मुंबईमध्ये खासकरून रेलेव्हमध्ये काम शोधात असाल तर ही बाब लक्षात असू द्या कि, या भरतीच्या प्रक्रियेमध्ये मुंबईत ६९९ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहार. त्यामुळे, या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी लवकर आपला अर्ज नोंदवण्यात यावा.
हे देखील वाचा : CAPF ने भरतीच्या प्रक्रियेला केली सुरुवात; मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी होणार भरती
उमेदवारांना काहीच दिवसाचा अवधी उरला आहे, त्यामध्ये त्यांना अर्ज प्रक्रिया पूर्णत्वास आणायची आहे. मुंबईत ६९९ पदे तर अहमदाबादमध्ये २१० पदांसाठी RRB ने ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरतीमध्ये कमर्शियल कम टिकेट क्लर्कच्या पदासाठी २०२२ जागा रिक्त आहेत. एकंदरीत, मुंबईमध्ये कमर्शियल कम टिकेट क्लर्कच्या पदाची ४९७ पदे रिक्त आहेत. यात सेंट्रल रेल्वेतील ३७२ पदांचा समावेश आहे. तर SCR च्या २१ रिक्तजागांसाठी तर वेस्टर्न रेल्वेतील १०४ पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्टच्या पदासाठी ३६१ जागा रिक्त आहेत. यातील एकूण ४५ उमेदवारांची नियुक्ती मुंबईत केली जाणार आहे. सेंट्रल रेल्वेमध्ये या पदासाठी ३६ जाग आहेत, तर वेस्टर्न रेल्वेमध्ये या पदासाठी ९ जागा आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या पदासाठी ९९० जाग शिल्लक आहेत. मुंबईतील CR रेल्वेमध्ये १०२, SCR मध्ये २ तर WR मध्ये ४३ जागा शिल्लक आहेत. एकंदरीत, या पदांसाठी मुंबईत एकूण १४७ जागा शिल्लक आहेत.
हे देखील वाचा : वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडमध्ये भरतीला सुरुवात; सिक्योरिटी गार्डच्या पदासाठी व्हॅकन्सी
RRB च्या या भरतीमध्ये ट्रेन्स क्लर्कसाठी देशभरात ७२ जागा शिल्लक आहेत. तर मुंबईत यातील १० जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यात सेंट्रल रेल्वेतील ८ जागांचा तर वेस्टर्न रेल्वेतील २ जगणंच समावेश आहे. क्लार्कच्या पदासाठी अर्ज करू इच्छुक उमेदवारांना इंग्लिश आणि हिंदी टायपिंगमध्ये कौशल्य असावे. तसेच या भरतीमध्ये अर्जकर्ता उमेदवार HSC किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण असावा. १८ ते ३३ वर्षे वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज नोंदवता येणार आहे.