फोटो सौजन्य - Social Media
वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडने भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये मुख्यतः सिक्योरिटी गार्डच्या पदासाठी भरती केली जाणार आहे.
हे देखील वाचा : ‘या’ भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; टेक्निशियन पदासाठी होती भरतीची प्रक्रिया
एकूण ९०२ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. मुळात, या भरतीची विशेष गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात. या भरतीसाठी सहभाग घेऊ इच्छुक असणार्या उमेदवारांना ऑनलाईन स्वरौपात अर्ज करायचे आहे. वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडने आयोजित केलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही आहे. उमेदवार अगदी निशुल्क या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे.
या अटी शर्ती उमेदवाराच्या शिक्षणाविषयी आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवाऱ्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात. दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच इतर पदांसाठी शिक्षणा संबंधित अटी वेगवेगळ्या आहेत. संबंधित क्षेत्रात उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : JIPMPER मध्ये प्रोफेसर पदासाठी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज
वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडच्या या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड त्याच्या गुणांच्या आधारे तसेच दस्तऐवजांची पडताळणीच्या आधारे केली जाईल. तसेच उमेदवारांना नियुक्ती मिळवण्यासाठी वैद्यकीय चाचणीला पात्र करावे लागणार आहे. सिक्युरिटी गार्ड व्हेकन्सी अंतर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला प्रथम अधिकृत पोर्टलवर जावे लागेल, येथे अधिकृत अधिसूचनेवर क्लिक करावे लागेल. काळजीपूर्वक सर्व वाचून घेऊन, अर्जाच्या पर्यायावर क्लिक करा. मागतिलेला तसेच आवश्यक तो तपशील द्या. अर्ज तपासून त्याला सबमिट करून घ्या. भविष्यातील; गरजेसाठी अर्जाची एखादी परत स्वतःजवळ काढून घ्या.