फोटो सौजन्य - Social Media
मुंबई हाई कोर्टामध्ये भरतीच्या प्रक्रियेला आयोजित करण्यात आले आहे. क्लार्क भरतीसाठी ही अर्ज प्रक्रिया आयबजीत करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून १२९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सरकारी नोकरी मिळवण्याचा हा उत्तम पर्याय आहे. इच्छुक उमेदवार ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना अशा प्रकारे करता येईल अर्ज:
अशा प्रकारे होणार उमेदवारांची नियुक्ती
अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कर्त्या उमेदवारांना या भरतीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. यामध्ये लिखित परीक्षेचा समावेश आहे. तसेच उमेदवारांना टाइपिंग टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. या सर्व टप्प्यांना पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. ही पात्रता निकष उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. तसेच उमेदवारांना काही शैक्षणिक अटी पात्र करावे लागणार आहेत. उमेदवारांना २९,२०० रुपयांपासून ते ९२,३०० पर्यंत दरमाह वेतन मिळणार आहे. अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून पदवीधर असणे आवश्यक आहे. मुळात, या भरतीसाठी कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. या भरती संबंधित अधिक माहिती जाहीर अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद वयोमर्यादे संदर्भात असलेल्या अटीनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर एससी, एसटी, ओबीसी तसेच एसबीसी उमेदवारांसाठी आयुमर्यादा ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.