फोटो सौजन्य - Social Media
इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस ( ITBP ) ने भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. महत्वाची बाब म्हणजे अद्याप या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नाही आहे. जर तुम्हाला ITBP च्या या भरती प्रक्रियेत सहभाग घ्यायचं आहे तर लवकर विचार करण्यास सुरुवात करा. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ८ ऑक्टोबरपासून उमेदवारासाठी अर्ज करण्याचा ऑनलाईन द्वार खुला करण्यात येणार आहे. एकंदरीत, उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपामध्ये या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटीसच्या विविध पदांसाठी भरतीला सुरुवात; आजच करा अर्ज
ITBP द्वारे आयोजित या भरती प्रक्रियेमध्ये कॉन्स्टेबल ड्राइवरच्या ५४५ पदांसाठी जागा रिक्त आहे. जर तुम्ही कॉन्स्टेबल ड्राइवर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर ८ ऑक्टोबर २०२४ ते ६ नोव्हेंबर २०२४ च्या मध्यरात्री ११:५९ पर्यंत अर्ज करू शकता. ५४५ पदांमधील २०९ जागा अनारक्षित आहेत. इतर जागा आकर्षित प्रवर्गासाठी असून ७७ जागा SC, ४० जागा ST, १६४ जागा OBC तर ५५ जागा आर्थिक दुर्बल असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी काही अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. या अटी शर्तींना पात्र उमेदवार या भरतीमध्ये आपली जागा निश्चित करणार आहे. SSC उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज कर्त्या उमेदवाराकडे हेवी ड्राइविंग परवाना तसेच हेवी वेहिकल चालवण्याचा अनुभव असला पाहिजे. अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या आयुमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
हे देखील वाचा : ITI मधील अनुभवी तासिका निदेशकांसाठी, मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा इ-चलानच्या माध्यमातून करता येईल. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी तसेच OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे, तर इतर प्रवगातील उमेदवारांना मुख्यतः SC / ST, महिला तसेच माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. त्यांना निशुल्क अर्ज करता येणार आहे.