फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. CBSE मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फार महत्वाची बातमी आहे. CBSE ने २०२५ चे शिक्षणासबंधित वेळापत्रक जाहीर केले आहेत. या वेळेपत्रकामध्ये परीक्षेसंबंधित तारखा नमूद आहेत. यंदाच्या वर्षी दहावी तसेच बारावीमध्ये CBSE बोर्डातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पाहता येणार आहे.
हे देखील वाचा : BEL मध्ये ९० रिक्त पदांसाठी भरती; डिप्लोमाधारक करू शकतात अर्ज
तसेच या वेळापत्रकाचा माध्यमातून त्यांच्या परीक्षेचा काळ जाऊन आपल्या तयारीला सुरुवात करता येणार आहे. हे २०२५ चे हे डेट शीट CBSE ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या डेट शीटमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा तसेच थायोरी परीक्षेसंदर्भात तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. CBSE बोर्डात शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतली जाणार आहे. तर दहावी इयत्तेची थेअरी परीक्षा फेब्रुवारी २०२५ च्या १५ तारखेपासून घेतली जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे बारावीच्या इयत्तेसाठीदेखील याच तारखा निश्चित केल्या गेल्या आहेत. बारावीचे प्रॅक्टिकल्स जानेवारी २०२५ च्या १ तारखेपासून घेतली जाणार आहे. तर थेअरी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून घेतली जाणार आहे. तसेच, यूरोपियन विंटर स्कूलने ५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४ पर्यंत वर्चुअल वोकेशनल आयोजित केले आहे. एकंदरीत, अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अनुसार, “इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीचे प्रॅक्टिकल्स आणि थेअरी परीक्षा अनुक्रमे: ०१/०१/२०२५ तसेच १५/०२/२०२५ पासून सुरु होणार आहेत.”
तसेच CBSE बोर्डाच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या विद्यालयांना सल्ला देण्यात आला आहे कि, प्रॅक्टिकलचे अंक जाहीर करण्या अगोदर त्याचे योग्य समीक्षण करावे. जाहीर झाल्यावर त्यामध्ये बदलाव करता येणार आहे. तसेच एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता, विषय कोड, विषयाचे नाव, थेअरी परीक्षेसाठी सर्वाधिक गुण, प्रात्यक्षिक परीक्षेत वापरलेली उत्तरपत्रिका, प्रकल्प मूल्यांकन, अंतर्गत मूल्यांकन अशा अनेक बाबी नमूद आहेत.