फोटो सौजन्य - Social Media
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांन या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ९० उमेदवारांना अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे. एकंदरीत या भरतीच्या माध्यमातून BEL मध्ये असलेले ९० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचणा जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांना या भरतीसाठी जाहीर करण्यात आलेले अधिसूचनेचा आढावा घ्यावा लागणार आहे.
हे देखील वाचा : पावर ग्रीडमध्ये भरतीला सुरुवात; 800 हून जास्त रिक्त पदांसाठी व्हॅकन्सी
BEL च्या या भरतीमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी स्टायपेंड पुरवण्यात येणार आहे. नियुक्त उमेदवाराला १२,५०० रुपयांपर्यंत स्टायपेंड देण्यात येईल. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी BEL च्या https://bel-india.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. उमेदवारांना या भरतीसाठी ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
BEL च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता मानदंडांना पात्र करावे लागणार आहे. मुळात, या भरतीसाठी फक्त भारतीयांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, अर्ज कर्ता उमेदवार भारतीय असणे अनिवार्य आहे. तसेच अर्ज कर्ता उमेदवार डिप्लोमा धारक असणे अनिवार्य आहे. अर्ज कर्ता उमेदवाराचे AICTE किंवा GOI द्वारे मान्यता प्राप्त असलेल्या संस्थेतून डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या भरतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात काही अटी शर्ती जाहीर करण्यात आली आहे. एकंदरीत, जास्तीत जास्त २५ वर्शे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ३ वर्षांपर्यंतची सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींमधून येणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना अधिक ५ वर्षांपर्यंतची सूट देण्यात येईल. PWD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० वर्षांपर्यंतची सूट देण्यात येईल.
हे देखील वाचा : पंजाब सिंध बँकेमध्ये अप्रेंटिसशिपच्या 100 जांगासाठी भरती ! तरुणांनी तात्काळ करा अर्ज
उमेदवारांना अशा प्रकारे करता येईल अर्ज: