फोटो सौजन्य - Social Media
विवा महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. यंदा “तरुणांसाठी मानसिक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनात भावनिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व या कार्यक्रमातून पटवून देण्यात आले.
हे देखील वाचा : UGC NET 2024: NTA कडून जून UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर !
मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व तर सांगण्यात आलेच पण त्याचबरोबर मानसिक शांतता, भावनिक आधार, उत्तम मानसिक आरोग्य यासारखे विषय हाताळण्यात आले. त्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की संगीत हा मानसिक शांतता आणि आरोग्य जपण्याकरिता महत्त्वाचा उपाय मानला जातो. आज अनेक गंभीर आजारांकरीता म्युझिक थेरेपी वापरले जाते. याच म्युझिक थेरेपीचा वापर करून संगीत खुर्ची हा खेळ विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांचे बदलणारे मूड, क्लॅप ऑन द टॅप द्वारे दृकश्राव्य एकाग्रता आणि सजगता यांच्यातील संबंध, नैराश्य, ताण तणाव वरील उपाय असे विविध प्रकार कार्यक्रमांमध्ये नियोजित करून विद्यार्थ्यांच्या मानसिक दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. हा उपक्रम मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख रश्मी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन FYBA च्या तसेच TYBA चे विद्यार्थी सकिना नकवी, दिप्ती तौर, अर्पिता निगम, मनस्वी मयेकर, समिक्षा वळवी, यश मेहेर, आदित्य ठाकूर, सीता मिजार, विशाखा भालेराव, आणि शीतल दस्कबी यांचा विशेष समावेश होता. विद्यार्थी सुधांशू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या आकर्षक कार्यक्रमाने मानसिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढविण्यासाठी आवश्यक असलेले उपाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित केले.
हे देखील वाचा : दहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला बदल; विषयांची संख्या वाढणार?
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ.वी.श.अडिगल, उपप्राचार्य डॉ. प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. दीपा वर्मा यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवली आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित केले.