सीईटी (फोटो- ai gemini)
सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थी व पालक यांनाही आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर सीईटीच्या संबंधित काही चुकीची माहिती/पोस्ट, रील, पॉडकास्ट, व्हिडीओ व आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास
तसेच परीक्षा केंद्रे बदलून देण्याचा दावा करणे, पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा दावा करणे अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील तक्रारी असतील तर socialmedia.complaints@mahacet.org याच ईमेलवर पाठवून द्याव्यात. या तक्रारीची सीईटी कक्ष सत्यता पडताळून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर शिवा नामक युट्यूबरने एमएचटी सीईटी २०२७ च्या दोन्ही परीक्षेच्या तारखा, त्याच्या अर्ज नोंदणी करण्याच्या तारखा, निकालाच्या तारखा पॉडकास्ट करून जाहीर करण्यात आल्या होत्या, यामुळे विद्यार्थी आणि पालकात संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. अजून सीईटी कक्षाने २०२७ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. यामुळे डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलला एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. व सदरचा व्हिडीओ यूट्यूबवरून तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर याचे स्पष्टीकरण प्रसारित करण्यात यावे व याबाबतचे लेखी स्पष्टीकरण पुराव्यासह सीईटी कक्षाकडे सादर करण्याचे निर्देश या कायदेशीर नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई






