ज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एमसीए व एमएचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीस ७ जानेवारी २०२६ पासून प्रारंभ झाला आहे.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २०२६-२७ पासून सीईटी परीक्षा दोनदा घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी मिळणार आहेत.
अंदाजे वेळापत्रक अभ्यासक्रमांसाठी मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक तात्पुरते असून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेल च्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
राष्ट्रीय पातळीवर जेईई परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते. राज्यातील विद्यार्थ्यांनाही अशाच दोन संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.