CSIBER Kolhapur Recruitment : खूशखबर! कोल्हापूरच्या CSIBER संस्थेत २८ प्राध्यापक पदांची भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या
या भरती मोहिमेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ही पदे भरली जाणार आहेत. संस्थेच्या नियमानुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून पात्रतेबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२६ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत) निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे या admin@siberindia.edu.in ई-मेल पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड चाचणी किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. कोल्हापूर येथे शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी व जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी [http://www.siberindia.edu.in/](http://www.siberindia.edu.in/) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.






