फोटो सौजन्य- iStock
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (CSIR-UGC NET) 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. याकरिता पात्र उमेदवार हे csirnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
डिसेंबर 2024 मध्ये CSIR-UGC NET परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहिती बुलेटिनमध्ये सूचीबद्ध केलेल्या पात्रता निकषांचे पूर्ण अवलोकन करणे आवश्यक आहे.CSIR-UGC NET ही परीक्षा 16 फेब्रुवारी 2025 आणि 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान होणार आहे, ज्याचा एकूण कालावधी 180 मिनिटे (तीन तास) आहे.
अधिकृत सूचनेनुसार, संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा डिसेंबर-2024, जी भारतीय नागरिकांची ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि प्रवेशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी परीक्षा आहे.या परीक्षेद्वारे पीएच.डी. आणि पीएच.डी.साठी प्रवेश ही निश्चित केला जातो. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) मोडद्वारे घेतली जाते.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख याकरिता बोर्ड, विद्यापीठ प्रमाणपत्राची प्रत.
उमेदवाराच्या ओळखीकरिता बँक पासबुक/पासपोर्ट क्रमांक/रेशन कार्ड/आधार कार्ड क्रमांक/मतदार ओळखपत्र क्रमांक/छायाचित्रासह इतर सरकारी ओळखपत्र.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख- 30 डिसेंबर 2024
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
उमेदवारांना त्यांचे अर्ज फक्त एकदाच सबमिट करण्याचे आवाहन केले जाते. अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांना एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट करण्याचा अधिकार नाही.अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. परीक्षेचे शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI सारख्या उपलब्ध पेमेंट पर्यायांद्वारे ऑनलाइन भरले जाणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये त्यांचा ई-मेल पत्ता आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. NTA सर्व पत्रव्यवहार ईमेल किंवा एसएमएसद्वारे नोंदणीकृत मेल पत्त्यावर किंवा मोबाइल नंबरवर पाठवेल. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा स्पष्टीकरणासाठी, उमेदवार NTA हेल्प डेस्कशी 011-40759000 किंवा 011-69227700, किंवा emailcsirnet@nta.ac.in वर संपर्क साधू शकतात.
CSIR-UGC NET 2024: अर्ज कसा करावा?
30 डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख असली तरीही ज्या उमेदवारांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी तात्काळ अर्ज करावा.