फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पब्लिक सेक्टरमध्ये काम करण्याच्या किंवा करिअर घडवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदची बातमी आहे. मुळात, भारतीय शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या एका कंपनीमध्ये अप्रेंटीशीप पुरवण्यात येत आहे. भरतीची सुरवात करण्यात आली आहे. तसेच या भरती संदभात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांना जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा देखील घेता येणार आहे. राईट्स लिमिटेड (RITES) ने या भरतीचे आयोजन केले आहे. विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी तसेच नवं तरुणांना कामाची संधी म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी अप्रेंटिसशिप पुरवण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २२३ जणांना अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे.
RITES द्वारे आयोजित या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. एकंदरीत, RITES च्या www.rites.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना २५ डिसेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर करण्यात आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ग्रेजुएट अप्रेंटिस पदासाठी ११२ जागा रिक्त आहेत. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी २९ जागा रिक्त आहेत. तर ट्रेड अप्रेंटिस (ITI पास) पदासाठी ४६ जागा अशा एकूण २२३ जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारांना मिळणाऱ्या स्टायपेंड विषयी माहिती पुरवण्यात आली आहे. एकंदरीत, ग्रेजुएट अप्रेंटिसच्या पदासाठी १४,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. डिप्लोमा अप्रेंटिस पदी नियुक्त उमेदवारांना दरमाह १२,००० रुपयांचे स्टायपेंड दिले जाईल. तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला १०,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. नियुक्तीच्या प्रक्रियेत उमेदवारांची नियुक्ती फक्त मेरिटच्या आधारवर केली जाईल. या नियुक्तीच्या प्रक्रियेत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लिखित परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नाही. तसेच मुलाखतीला सामोरे जाण्याची आवश्यकता नाही.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी NATS/नापास या पोर्टलला भेट देणे अनिवार्य आहे. तसेच अधिसूचनेत दिलेला गूगल फॉर्मदेखील २५ डिसमेंबर २०२४ या तारखेच्या आत भरण्यात यावा. दरम्यान, नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ईमेलद्वारे कळवण्यात येईल. त्यामुळे अर्ज कर्त्या उमेदवारांनी नियमित ईमेलवर लक्ष ठेवावे. मुळात, काही अटी शर्ती आहेत, ज्यांना पात्र करणे अनिवार्य आहे. एकंदरीत, या अटी शर्तीना पात्र उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठीव जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.